पारुंडी येथे ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर ३० वर्षांवरील नागरिकांची असंसर्गजन्य आजारांसाठी तपासणी
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ व ‘३० चा पल्ला’ या मोहिमेच्या अनुषंगाने पैठण तालुक्यातील पारुंडी येथे दि. ८ ऑक्टोबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले
प्राथमिक आरोग्य केंद्र बालानगर अंतर्गत उपकेंद्र पारुंडी यांच्या वतीने आयोजित या शिबिरात ३० वर्षांवरील महिला व पुरुषांची असंसर्गजन्य आजारांसाठी (एनसीडी) आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून आजारांचे वेळीच निदान, प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक उपचारांबाबत माहिती देण्यात आली.वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पवार व डॉ. शंकर धंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप चव्हाण, डॉ. पूजा गारुळे, डॉ. स्वाती पायघोण, आरोग्य सेविका सुषमा आव्हाळे, आरोग्य सेवक हिम्मत भराट, आशा बीएफ ज्योती बोंबले तसेच आशा सेविका शोभा आडगळ, वर्षा रोडगे, संध्या दौड व प्रियांका राठोड यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करण्यावर भर देण्यात आला.