vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेट’ची सोय; उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर

बारामती पोटनिवडणुकीत मतदारांसाठी ‘ईसीआयनेट’ची सोय; उमेदवारांची सविस्तर माहिती एका क्लिकवर

राज्य प्रतिनिधी-बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना उमेदवारांविषयी सविस्तर व पारदर्शक माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ‘ईसीआयनेट’ या एकात्मिक डिजिटल व्यासपीठाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मतदारांना उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता व दायित्वे, शैक्षणिक पात्रता तसेच अधिकृत सामाजिक माध्यमांवरील खात्यांची माहिती ‘आपला उमेदवार जाणून घ्या’ या घटकाद्वारे पाहता येणार आहे.

मतदारांना ईसीआयनेटमधील “निवडणूक प्रक्रिया” या विभागांतर्गत हा घटक सहज उपलब्ध असून, त्याद्वारे उमेदवारांनी सादर केलेले संपूर्ण प्रतिज्ञापत्र (फॉर्म २६) देखील उतरवता येणार आहे. यामुळे मतदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होणार आहे.

ईसीआयनेट हे जगातील सर्वात मोठे निवडणूक सेवा व्यासपीठ असून, भारतातील निवडणूक प्रक्रियेशी संबंधित ४० हून अधिक अॅप्स व संकेतस्थळे एकत्रित करून एकसंध डिजिटल अनुभव देण्यात आला आहे. या व्यासपीठाद्वारे मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्जाची स्थिती पाहणे, निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद, ई-मतदार ओळखपत्र डाउनलोड, मतदानाचे प्रवाह तसेच तक्रार निवारण यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत

याशिवाय, ईसीआयनेटवर ‘सी-सिव्हिजल’ या अॅपद्वारे आचारसंहिता भंगाच्या तक्रारी नोंदविता येतात, तर ‘सक्षम’ उपक्रमाद्वारे दिव्यांग मतदारांसाठी सुलभ सेवा पुरविण्यात येत आहेत. या सर्व सुविधा एकाच सुरक्षित व्यासपीठावर उपलब्ध असल्याने मतदारांना तत्काळ माहिती व तक्रार निवारणाची प्रभावी सोय मिळत आहे.

बारामती पोटनिवडणुकीत पारदर्शक, सुजाण आणि सक्रिय मतदानासाठी मतदारांनी ईसीआयनेटचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

धारावीतील संत रोहिदास समाज मंडळाचा होलिकोत्सव समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरा

पीएम सेतू योजनाःऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे उन्नतीकरण;रोजगारक्षम कौशल्यासाठी जिल्ह्यातील उद्योगांचा सहभाग

शबरी नॅचरल्स’चा डंका आता दिल्लीपर्यंत; केंद्रीय जनजातीय संचालक डॉ. वर्नाली डेका यांच्याकडून कौतुकाची थाप

पोषण माह २०२६ तसेच सेवा संकल्प अभियान अंतर्गत मुरबाड येथे बाल संरक्षण समितीबाबत प्रशिक्षण-बालकांचे हक्क, बाल विवाह प्रतिबंध व संरक्षणाबाबत अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

जलपुनर्भरणासंदर्भात व्यापक जनजागृती करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्‌घाटन