vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

बॉलीवूड प्रतिनिधी

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभावी खलनायकांपैकी एक आणि ‘गजनी’ चित्रपटातील ‘गजनी धर्मात्मा’ या अजरामर भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. गेल्या पाच वर्षांपासून ते ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीने एक दमदार चरित्र अभिनेता आणि खलनायकी भूमिकांचा हुकमी एक्का गमावला आहे.

२१ जानेवारी १९५२ रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे जन्मलेल्या प्रदीप रामसिंह रावत यांना लहानपणापासूनच रंगभूमीची आवड होती. स्थानिक नाटकांमधून अभिनयाची सुरुवात केल्यानंतर ते मुंबईत आले. १९८५ मध्ये ‘मेरी जंग’ चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील ‘अश्वत्थामा’ या भूमिकेने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली

त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा टप्पा ठरला तो ‘गजनी’. तमिळ आणि हिंदी अशा दोन्ही आवृत्त्यांमध्ये त्यांनी साकारलेला ‘गजनी धर्मात्मा’ हा भारतीय सिनेमातील सर्वाधिक लक्षात राहणाऱ्या खलनायकांपैकी एक मानला जातो. ‘सरफरोश’, ‘लगान’, ‘बादशाह’, ‘आवारा पागल दीवाना’ यांसह हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही त्यांनी प्रभावी भूमिका साकारल्या

पडद्यावर धाकदायक वाटणारे प्रदीप रावत प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अत्यंत शांत, शिस्तप्रिय आणि मनमिळावू होते. ‘अश्वत्थामा’पासून ‘गजनी धर्मात्मा’पर्यंतचा त्यांचा अभिनयप्रवास भारतीय चित्रपटसृष्टीत कायम स्मरणात राहील. या अष्टपैलू आणि अविस्मरणीय कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांच्या अडचणींवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक तोडगा काढावा -जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प व अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वेशी संबंधित प्रश्नांवर चर्चा

AICCTU देशव्यापी संपाला पाठिंबा, जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन*मराठवाडा सर्व श्रमिक संघटनेची नियोजन बैठक संपन्न***

vishwatmaklokswamivarta

दाभोलकर खटल्यातील हिंदुत्वनिष्ठ युवक शरद कळसकर यांना जामीन !**अजून किती वर्ष सनातन संस्थेला आरोपी करत रहाणार?* – सनातन संस्था

vishwatmaklokswamivarta

मुंब्रा व दिवा परिसरात अनधिकृत पाणी जोडण्यांविरुद्ध महापालिकेची विशेष मोहिम…

महाराष्ट्र सदनात जागतिक पाक संस्कृतीचा संगम विविध देशातील ३० दिग्गज शेफकडून राज्याच्या आदरातिथ्याचा गौरव

नवी मुंबई महानगरपालिका शाळांची प्रत्यक्ष पाहणी -सौ. सुजाता सुरज पाटील(महापौर, नवी मुंबई)

vishwatmaklokswamivarta