vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मदतीचा एक दिवा लावण्याचे महापौर सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन

दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मदतीचा एक दिवा लावण्याचे महापौर सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन

नवी मुंबई प्रतिनिधी-सर्वत्र दिवाळी सण उत्साहाने साजरा होत असताना सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीत आपल्या शेतकरी बांधवांची आठवण ठेवून मदतीचा एक दिवा दुष्काळग्रस्त बांधवांसाठी लावावा व संवेदनशील नवी मुंबईकर नागरिक, संस्थांनी आपल्या परीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतनिधी जमा करावा असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील व महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

दिवाळी सणाच्या उत्साहाने भारलेले प्रकाशमयी वातावरण आपल्या भोवताली सर्वत्र असताना ज्या बळीराजाच्या घामातून आपल्या ताटात अन्न येते, ते शेतकरी बांधव आणि त्याचे कुटुंब दुष्काळाच्या छायेत आहेत याची जाणीव ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. आपण इथे घराभोवती दिव्यांची रोषणाई करीत असताना गावाकडल्या हजारो घरांमधील अंधाराची जाणीव ठेवणे संवेदनशीलतेचे लक्षण आहे. आपला मदतीचा एक दिवा त्यांच्या घरातील अंधार काही प्रमाणात दूर करू शकतो. म्हणूनच सुजाण नवी मुंबईकर नागरिकांना हे आवाहन करण्यात आले आहे.

या दिवाळी सणाच्या उत्साही खरेदीत आपण फराळ, फटाके आणि इतर अनावश्यक खर्चात थोडीशी कपात करून, तो निधी आपल्या दुष्काळग्रस्त बांधवांसाठी देऊ शकतो. हा केवळ एक मदतीचा हात नाही, तर संकटसमयी आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हा विश्वास त्यांना देण्याचा प्रयत्न असणार आहे.

नवी मुंबईने नेहमीच प्रत्येक सामाजिक संकटाच्या वेळी मदतीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. याही वेळी दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पुनर्वसन आणि आवश्यक मदत पोहोचवण्यासाठी आपल्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. त्या अनुषंगाने सर्व गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट कंपन्या तसेच व्यावसायिक व व्यापारी संघटना यांनी पुढाकार घेऊन आपापल्या स्तरातून अधिकाधिक निधी संकलित करावा तसेच नागरिकांनीही आपल्या परीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मदतनिधी जमा करावा असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर व आयुक्त यांचेमार्फत करण्यात आले आहे

मुख्यमंत्री सहाय्यता निधी बँक खात्याचा तपशील :-मुख्यमंत्री सहाय्यता निधी ( Chief Minister’s Relief Fund)बचत खाते क्र. (Saving Account No.) : 10972433751स्टेट बॅंक ऑफ इंडिया (State Bank of India)मुंबई मेन ब्रांच, (Mumbai Main Branch) फोर्ट, मुंबई (Fort, Mumbai) – 400001.ब्रँच कोड (Branch Code) :- 00300आयएफएस कोड (IFS Code) : SBIN 0000300

आपले हे छोटेसे योगदान दुष्काळग्रस्तांच्या आयुष्यात आशेचा एक किरण ठरू शकते. तेव्हा या दिवाळीत एक दिवा ‘माणुसकीचा’ आणि ‘सहानुभूतीचा’ लावूया आणि आपण सर्व संवेदनशील नवी मुंबईकर नागरिकांनी मिळून या सेवाभावी कार्यात मनापासून सहभागी होऊया असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार· केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय ‘जेंडर रिसोर्स सेंटर’ स्थापन करणार

माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाला आज १ एप्रिल पासून प्रारंभ

इयत्ता 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांचा मुल्यमापन निकाल संकेतस्थळावर जाहीर

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली,राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जिल्हा परिषद ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ निमित्त शपथविधी कार्यक्रम उत्साहात“आपली सेवा, आमचे कर्तव्य” संकल्पाने पारदर्शक व वेळेत सेवा देण्याचा निर्धार

ठाणे RTO कडून दुहेरी ऑटो परमिट प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात FIR दाखल आमदार नरेंद्र मेहता यांनी उघडकीस आणले होते दुहेरी परमिट प्रकरण..

vishwatmaklokswamivarta