vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

हवा व ध्वनी प्रदूषणाबाबत मा.न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे नवी मुंबईकरांना आवाहनयाबाबत तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

हवा व ध्वनी प्रदूषणाबाबत मा.न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे नवी मुंबईकरांना आवाहनयाबाबत तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर

         नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील फटाके विक्री करणारे सर्व व्यावसायिक व फटाक्यांचा वापर करणारे नागरिक यांना आवाहन करण्यात येते की, भारत सरकार अधिसूचना क्रमांक G.S.R. 682 (E) Dt. 05/10/1999 अन्वये 125 dB (AI)पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन,विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे.

          मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात, हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत. तसेच इतर वेळी सरासरी 91 इतक्या असणा-या हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये (AQI) दिवाळी सणादरम्यान फटाक्यांमधून निघणा-या विषारी घटकांपासून उद्भवणा-या वायू प्रदूषणामध्ये सरासरी 212 इतकी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनासंबंधीच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

          त्या अनुषंगाने जनहित याचिका क्र. 152/2015 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तरी फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करावयाची नाही, तसेच परवानगी असलेल्या फटाक्यांची महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे.

          राष्ट्रीय हरीत लवाद मुख्य खंडपीठ, नवी दिल्ली यांचे दि.3/11/2023 रोजीचे सुनावणी आदेश तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे स्वतःहून दाखल करुन घेतलेली जनहितार्थ याचिका क्र.3/2023 च्या आदेश कलम 7 (ज) नुसार नागरिकांनी केवळ संध्याकाळी 7 ते रात्री 10 या कालावधीतच फटाके वाजवायचे आहेत.

          सदर आदेशातील कलम 7 (क) नुसार सर्व शैक्षणिक संस्था यांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी होणेबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात व फटाक्यांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन करावयाचे आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने दक्षतेने अंमलबजावणी करावयाची आहे व सदर आदेशाच्या कलम 8 नुसार याची अंमलबजावणी होणेबाबत महानगरपालिकेचे संबंधित विभागीय सहाय्यक आयुक्त यांनी देखील पडताळणी करुन दक्षता घ्यावयाची आहे.

          त्याचप्रमाणे मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वत:हून दाखल केलेल्या जनहितार्थ याचिकेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजना, अंमलबजावणी तसेच दंडात्मक तरतुदी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत याची नागरिकांनी / संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावयाची आहे.

          मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी Suo Motu PIL No. 01 of 2026 या प्रकरणी दिनांक 15/10/2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार – ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय प्रदूषणासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी प्राप्त करण्यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस विभाग यांनी स्वतंत्र दूरध्वनी क्रमांक (Dedicated Telephone Numbers) तसेच प्रभागनिहाय ई-मेल आयडी उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

          त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे असणारा हेल्पलाईन भ्रमणध्वनी क्रमांक व सर्व विभाग कार्यालयांचे अधिकृत ई-मेल आयडी हे ध्वनी प्रदूषण व पर्यावरणीय प्रदूषणाबाबत तक्रारी प्राप्त करुन घेण्याच्या अनुषंगाने अधिकृत संपर्कध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी खालीलप्रमाणे आहेत.

 

अ.क्र. 1विभाग – बेलापूर भ्रमणध्वनी क्रमांक – 8976954881ई-मेल आयडी – amc_belapur_ward@nmmc.gov.in

अ.क्र. 2-विभाग – नेरुळ भ्रमणध्वनी क्रमांक – 8976954882 ई-मेल आयडी – amc_nerul_ward@nmmc.gov.in

अ.क्र. 3 विभाग – वाशी भ्रमणध्वनी क्रमांक – 8976954884 ई-मेल आयडी – amc_vashi_ward@nmmc.gov.in

अ.क्र. 4 विभाग – तुर्भे भ्रमणध्वनी क्रमांक – 8976954883 ई-मेल आयडी – amc_turbhe_ward@nmmc.gov.in

अ.क्र. 5विभाग – कोपरखैरणे भ्रमणध्वनी क्रमांक – 8976954885ई-मेल आयडी – amc_koperkhairne_ward@nmmc.gov.iअ.क्र. 6 विभाग – घणसोली भ्रमणध्वनी क्रमांक – 8976954886ई-मेल आयडी – amc_ghansoli_ward@nmmc.gov.in

अ.क्र. 7 विभाग – ऐरोलीभ्रमणध्वनी क्रमांक – 8976954887ई-मेल आयडी – amc_airoli_ward@nmmc.gov.in

अ.क्र. 8 विभाग – दिघाभ्रमणध्वनी क्रमांक – 8976954889ई-मेल आयडी – amc_digha_ward@nmmc.gov.i

अ.क्र. 9Toll Free number1800222309 1800222310      महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान’, ‘स्वच्छ सर्वेक्षण 2026’ आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण’ अभियानांतर्गत’ फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिवल) सण-उत्सव साजरे करावयाचे आहेत. त्यानुसार नागरिकांनी मातीचे दिवे / पणत्या उजळवाव्यात, प्लास्टिकचा वापर टाळून कागदी किंवा कापडी आकाश कंदील लावावेत, फटाक्यांचा वापर टाळावा, प्लास्टिक ऐवजी कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा, झाडांवर विदयुत रोषणाई करु नये, सण – समारंभामध्ये टाकाऊ वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.      त्यानुसार येणारी दिवाळी हरित व पर्यावरणपूरक साजरी करावी असे सूचित करतानाच दिवाळीचा हा सण आनंदी व सुरक्षित राहो, अशा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत.

0000

संबंधित पोस्ट

अमराठी चालकांनी ‘मराठी संवाद भाषा’ अभियानात सहभागी व्हावे-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· स्थगितीचा कालावधी मराठी शिकण्यासाठी वापरा· १८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार

युगांडामधील इबोला रोगाचा ताजा उद्रेक आता जागतिक स्तरावर होत आहे  336 संशयित रुग्ण अन् 88 मृत्यू, इबोला उद्रेक; कोविडसारखी परिस्थिती ?

मॅग्मो संघटनेच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मंत्री प्रकाश आबिटकर सेवा विषयक मागण्यांवर कालबद्ध कार्यवाही

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना”ज्येष्ठ कलावंतांना सन्मानाने जगण्याचा आधारसांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत 1 ते 31 जुलैदरम्यान ऑनलाइन अर्ज प्रक्रिया;पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन

#यशवंतराव_चव्हाण_द्रुतगती मार्गावर वाहतूक तात्पुरती बंद..मुंबई पुणे एक्सप्रेस वे तीन तासाचा दोन दिवस ब्लॉग असणार आहे याकरता पर्यायी मार्ग जाणून घ्यावे

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 7036 झाडांची छाटणी – पावसाळी कालावधीत काळजी घेण्याचे आवाहन