vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राच्या क्रीडा विभागाची ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

नागपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र आज देशातील ‘स्पोर्ट्स पॉवरहाऊस’ म्हणून ओळखले जात आहे. खेलो इंडिया युथ गेम्स, नॅशनल गेम्स आणि नॅशनल स्कूल गेम्स या तिन्ही प्रमुख स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील विविध संघांनी आपले जेतेपद कायम ठेवत अव्वल स्थानाकडे वाटचाल केली आहे. जागतिक पातळीवर महाराष्ट्रानी आपला अपूर्व ठसा क्रीडा क्षेत्रातही उमटवावा यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. येत्या ऑलिम्पिक मोहिमेसाठी आतापासूनच महाराष्ट्राने ‘स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट’ तयार केली असून शहरांसमवेत ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तराचे खेळाडू घडावेत यासाठी तालुका स्तरावर ५ कोटी, जिल्हा स्तरावर २५ कोटी आणि विभागीय स्तरावर ५० कोटी रुपयांचे क्रीडा संकुल शासन साकारत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.

कोराडी येथील सेवानंद विद्यालय मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, आमदार आशीष देशमुख, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी खासदार सुबोध मोहिते, नागपूर जिल्हा ग्रामीण कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष संकेत बावनकुळे, क्रीडा उपसंचालक पल्लवी धात्रक व मान्यवर उपस्थित होते.

खेळाडूंना सक्षम व्यासपीठ आणि आर्थिक पाठबळ उपलब्ध व्हावे, त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सुविधा मिळाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यातील खेळाडूंना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहोत. विदर्भातील ग्रामीण खेळाडूंना चांगल्‍या दर्जाचे क्रीडा शिक्षण मिळावे, अद्ययावत सुविधा मिळाव्यात यासाठी मानकापूर येथे ७४६ कोटी रुपये निधीतून महाराष्ट्र शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘नागपूर स्पोर्ट्स हब’ साकारत आहे. नागपूर मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी एक चांगले वातावरण तयार झाले असून संकेत बावनकुळे यांनी राज्यपातळीवरच्या कबड्डी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आयोजकांबद्दल समाधान व्यक्त केले.

संबंधित पोस्ट

भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार रोखणार संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार

जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण विधेयकांवर सखोल चर्चा आणि व्यापक सल्लामसलत सुरू केल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा अपराजिता सारंगी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी साधणार आभासी संवाद..

गुटखा-पानमसाला, खाद्यतेल, दुग्धजन्य अन्न पदार्थ, इतर अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई,अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली कारवाई 

वैचारिक दिवाळखोरीकडे चाललेली पिढी समाजासाठी मोठे संकट : मंगल खिवंसरा

मुंबई आणि नवी मुंबईकरांसाठी आनंदाची पर्वणी घेऊन आलेल्या ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन