vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्वदेशी तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरता महत्त्वाची – राज्यपाल जिष्णु देव वर्मा ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे सहाव्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे आयोजन

राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्वदेशी तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भरता महत्त्वाची – राज्यपाल जिष्णु देव वर्मा,ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे सहाव्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे आयोजन

मुंबई,  : प्रतिनिधी राष्ट्रीय सुरक्षेची संकल्पना आता केवळ देशाच्या भौगोलिक सीमांच्या संरक्षणापुरती मर्यादित राहिलेली नाही. अंतर्गत सुरक्षा, सायबर सुरक्षा, सागरी सुरक्षा, आर्थिक व ऊर्जा सुरक्षा तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधा, डेटा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे संरक्षण यांचाही त्यात समावेश झाला आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि प्रगत संरक्षण प्रणालींच्या क्षेत्रात भारताने स्वदेशी क्षमता विकसित करून संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले

ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे आयोजन वांद्रे येथील हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एअर चीफ मार्शल आशुतोष दीक्षित, नौदलाचे माजी प्रमुख आणि अंदमान व निकोबार बेटांचे माजी नायब राज्यपाल ॲडमिरल डी. के. जोशी, पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल संजय वात्सायन, दक्षिण पश्चिम वायू कमांडचे प्रमुख एअर मार्शल पी. बी. शिवानंद, महाराष्ट्र व गुजरात क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी. एस. कुशवाह, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनचे संचालक परेश पागे उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पुणे स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्धएकूण ८६७ मतदारांचा समावेश; ४४१ पुरुष व ४२६ महिला मतदार..

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा(१४ जून) रोजी आयोजन;६४ उपकेंद्रांवर २० हजार ६६६ उमेदवार देणार परीक्षा

जेईई,नीट,सीईटी परीक्षेसाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबईत बिहार भवनला विरोध करण्याची राज ठाकरेंची भुमिका संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करा-रोहयो मंत्री भरत गोगावले· वि6भागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश