vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद 

59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद

 

       आरोग्य प्रतिनिधी   नागरी भागात अतिशय दाटीवाटीने वसलेल्या तसेच झोपडपट्टी सद्यृश्य भागात आरोग्य सेवांपासून नागरिक वंचित राहू नयेत यादृष्टीने प्राथमिक आरोग्य संस्थांना सक्षम करण्यासाठी तसेच सातत्यपूर्ण रितीने गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाकडून 15 व्या वित्त आयोगांतर्गत राज्य स्तरावर शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आली आहेत.

          त्यानुसार शासनाकडून नवी मुंबई महानगरपालिकेस 59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर करण्यात आलेली असून नमुंमपा कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 59 शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. याव्दारे विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी तसेच सुलभ व परवडणारी आरोग्य सेवा प्रदान करुन आरोग्य निर्देशांक वाढविण्याचे उद्दिष्ट साध्य होताना दिसत आहे.

          या शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये डॉक्टर, नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी उपलब्ध असून सकाळी 11 ते सायं. 7 या वेळेत नागरिक येथील आरोग्य सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

       या केंद्रामार्फत नागरिकांना विविध आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामध्ये – (1) गरोदरपण आणि बाळंतपणातील काळजी(2) नवजात शिशू आणि बाळांच्या आरोग्य सेवा(3) बालके आणि किशोरवयीन यांच्या आरोग्य सेवा(4) असंसर्गजन्य रोगांची तपासणी, प्रतिबंध, नियंत्रण आणि व्यवस्थापन(5) मुलभूत मौखिक आरोग्य सेवा- अशा विविध आरोग्य सेवांचा समावेश आहे.    त्याचप्रमाणे, संसर्गजन्य आजारांपासून बचाव कसा करावा, वैयक्तिक स्वच्छता आणि पोषणाचे महत्त्व याबद्दलही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जाते.        या आरोग्यवर्धिनी केंद्रांमुळे नागरिकांना त्यांच्या घारापासून जवळ प्राथमिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध होत असल्याने या केंद्रांना चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा स्तुत्य उपक्रम;स्थलांतरित मजुरांसाठी ‘आरोग्य साथी’ प्रशिक्षण संपन्न*

राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने पुण्यात एबी पीएम-जेएवाय आणि एबीडीएम विषयक दोन दिवसीय चिंतन शिबिराचे केले यशस्वी आयोजन; शिबिरात नवोन्मेष, डिजिटल आरोग्य आणि सहकार्यावर आधारित प्रशासनावर भर

राज्यातील सर्वात मोठ्या 50 बेड्स क्षमतेच्या नमुंमपा डायलिसीस सेंटरची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी 

जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध जनजागृती उपक्रम संपन्न

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध