vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

नागरिकांशी थेट संवादासाठी जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते सुरू शासनाच्या योजना व विकासकामांची अधिकृत माहिती आता एका क्लिकवर

नागरिकांशी थेट संवादासाठी जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते सुरू शासनाच्या योजना व विकासकामांची अधिकृत माहिती आता एका क्लिकवर

 

ठाणे, प्रतिनिधी: नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना, विकासकामे, जनजागृती मोहिमा तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची अधिकृत आणि अद्ययावत माहिती अधिक वेगाने, पारदर्शकपणे व विश्वासार्ह पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते सुरू करण्यात आले आहे

डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेऊन नागरिकांना अधिकृत माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद, ठाणेने Public App या लोकप्रिय डिजिटल व्यासपीठावर आपली उपस्थिती नोंदविली आहे. या माध्यमातून विविध विभागांच्या शासकीय योजना, विकासकामे, प्रेसनोट, जनजागृती मोहिमा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास, समाजकल्याण, महिला व बालविकास, पाणीपुरवठा, कृषी तसेच इतर विभागांच्या महत्त्वपूर्ण सूचना, निविदा, यशोगाथा आणि आपत्कालीन परिस्थितीतील आवश्यक माहिती नियमितपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेच्या अधिकृत Public App खात्यामुळे नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती वेळेत मिळणार असून विविध उपक्रमांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल. तसेच अधिकृत स्रोतावरून माहिती उपलब्ध होत असल्याने अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही

“डिजिटल माध्यमांच्या युगात नागरिकांपर्यंत शासनाची माहिती जलद, अचूक आणि विश्वासार्ह पद्धतीने पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद, ठाणेचे अधिकृत Public App खाते हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम ठरेल. शासनाच्या विविध योजना, विकासकामे आणि लोकहिताच्या उपक्रमांची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेत पोहोचावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी अधिकृत Public App खाते Follow करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा आणि अधिकृत माहितीचाच स्वीकार करावा.” – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

जिल्हा परिषद, ठाणेने नागरिकांशी अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान संवाद साधण्यासाठी अधिकृत Public App खाते सुरू केले असून, यापूर्वीपासून कार्यरत असलेल्या Facebook, Instagram, YouTube आणि X (Twitter) या अधिकृत सोशल मीडिया खात्यांसह आता Public App द्वारेही शासनाच्या विविध योजना, विकासकामे, प्रेसनोट, जनजागृती मोहिमा, महत्त्वाच्या सूचना, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास तसेच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची अधिकृत व अद्ययावत माहिती नागरिकांपर्यंत अधिक वेगाने पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांनी शासनाच्या योजना आणि जिल्हा परिषदेच्या उपक्रमांची विश्वासार्ह व अधिकृत माहिती मिळविण्यासाठी जिल्हा परिषद, ठाणेच्या Public App तसेच Facebook, Instagram, YouTube आणि X (Twitter) वरील अधिकृत खात्यांना Follow करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद, ठाणेच्या जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे यांनी केले आहे.

 

 

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ नागरिकांसाठी लाभदायी; एका छताखाली २३ शासकीय सेवा– उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर

जिल्ह्यात स्वच्छता ही सेवा अभियानाला सुरूवात

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी व पूर आपत्ती बाधितांना विशेष मदत पॅकेज, सवलती लागू बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश  शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करावी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

साहित्य अकादमीचा साहित्योत्सव होणार दिमाखदार;7 ते 12 मार्च दरम्यान दिल्लीमध्ये भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta