vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

दुष्काळग्रस्त शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची दिवाळी भेट अग्रीम मदत खात्यावर जमा झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

दुष्काळग्रस्त शेतकरी पोपट सावंत यांच्या घरी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची दिवाळी भेट,अग्रीम मदत खात्यावर जमा झाल्याबद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

सोलापूर, प्रतिनिधी: मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगोला तालुक्यातील इटकी येथील शेतकरी पोपट गोविंद सावंत यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी केली.

यावेळी मंत्री श्री. भोसले यांनी सावंत कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ व आहेर देत शुभेच्छा दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राज्य शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या अग्रीम आर्थिक मदत योजनेअंतर्गत पोपट गोविंद सावंत यांच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. याबद्दल सावंत यांनी समाधान व्यक्त केले.

पोपट सावंत यांच्या कुटुंबात तीन सदस्य असून त्यांच्या नावे १ हेक्टर २६ आर शेतजमीन आहे. या क्षेत्रात मका व बाजरी पिकांची लागवड करण्यात आली होती. पर्जन्यमानातील तुटवड्यामुळे मक्याचे ०.५० हेक्टर व बाजरीचे ०.५० हेक्टर असे एकूण १ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. बाधित क्षेत्राचा पंचनामा पूर्ण करण्यात आला असून शासन निर्णयानुसार त्यांच्या खात्यावर अग्रीम आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे.

यावेळी मंत्री श्री. भोसले यांनी सावंत कुटुंबीयांशी संवाद साधून शेतीची सद्यस्थिती, पिकांचे नुकसान तसेच शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या मदतीबाबत माहिती घेतली. मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेनुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करण्याच्या उपक्रमातून शासन शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी असल्याचा संदेश देण्यात आला.

यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख, तहसीलदार बाळूबाई भागवत, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

०००००

संबंधित पोस्ट

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta

रस्ते सुरक्षा अभियान विशेष लेख-

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासाठी ४.३३ कोटींचा निधी

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद• सहा विभागांना याच महिन्यात भेटी• विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांशी साधणार थेट संवाद

vishwatmaklokswamivarta

हातभट्टी विरोधी मोहिमेला वेग, दीड कोटीचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

शासकीय विभागानी नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा द्याव्यात – सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी,पारनेर तालुक्यात सेवा वितरणाचा आढावा