vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

शताब्दी चषक स्पर्धेत स्पोर्टिंग क्लबचा उपांत्य फेरीत प्रवेश ,विहान आसवलेचे त्रिशतक तर अद्वैत कचराजची दीड शतकी खेळी

शताब्दी चषक स्पर्धेत स्पोर्टिंग क्लबचा उपांत्य फेरीत प्रवेश ,विहान आसवलेचे त्रिशतक तर अद्वैत कचराजची दीड शतकी खेळी

 

ठाणे – प्रतिनिधी स्पोर्टिंग क्लब कमिटी द्वारा आयोजित शताब्दी चषक १४ वर्षाखालील आंतर क्लब स्पर्धेत, स्पोर्टिंग क्लब कमिटी ठाणे संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित झाला आहे. उप उपांत्य फेरीच्या आजच्या सामन्यात, विजय क्रिकेट क्लब संघाच्या विरुद्ध स्पोर्टिंग क्लबने ६७७ धावांचा डोंगर उभा करून पहिल्या डावाच्या आघाडीवर उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला.विहान आसवले याने ९ षटकार आणि ४५ चौकार मारून त्रिशतक झळकावले तर अद्वैत कचराज याने २६ चौकारांच्या मदतीने १५२ धावा ठोकल्या.पाठोपाठ विहान पुजारीने १३ चौकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली.स्पोर्टिंग क्लब तर्फे राशय सावंत याने ४७ धावात चार बळी घेऊन विजय क्रिकेट क्लब चा डाव १८९ धावांमध्ये गारद केला.स्पोर्टिंग क्लब क्रिकेट संघाची गाठ उपांत्य फेरीत ठाणे रॉयल स्पोर्ट्स फाउंडेशन संघाशी ९/१० नोव्हेंबर रोजी सेंट्रल मैदान ठाणे येथे पडेल.

000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई मनपा जिल्हास्तरीय शालेय ‘लॉन टेनिस’ स्पर्धा उत्साहात संपन्न

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित  सुरक्षा मंत्र: आधुनिक जगात एक पाऊल पुढे कार्यशाळेस  विद्यार्थीनी व महिलांचा उत्स्फुत प्रतिसाद

आंतरराष्ट्रीय खेळाडू भक्ती आंब्रे यांनी स्वीकारला जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार

मुंबई उपनगर जिल्ह्यातील युवकांमध्ये #क्रीडा विषयक आवड निर्माण करून त्यांना सक्षम खेळाडू घडविण्याच्या  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या वतीने हॅण्डबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, अथलेटिक्स तसेच फिटनेस प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन

खेळाडूंना ५% आरक्षणासाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ प्रणाली कार्यन्वित२४ तासांत डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र

जितेंद्र अग्रवाल यांची सतरावी फुल मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण

vishwatmaklokswamivarta