
दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर मनाई आदेश जारी
सांगली, प्रतिनिधी : दिपावली सणाच्या पार्श्वभुमीवर जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिला हद्दीत पुढीलप्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने शांतता, सुव्यवस्था राखण्याकरीता पेट्रोल/डीझेल पंप / डेपो, गॅस सिलेंडर गोडाऊन, केरोसीन तेलाचे डेपो, फटाक्यांची दुकाने, ज्यालाग्रही पदार्थाचे डेपो, रासायनीक पदार्थांचे डेपो या ठिकाणापासून 100 मीटर आत फटाके उडविण्यास मनाई केली आहे. शाळा, कॉलेज, रूग्णालये, न्यायालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जे शांतता झोन मध्ये येतात, त्या भागात 100 मीटर परिसरात फटाके फोडण्यास मनाई केली आहे. फटाक्याच्या लड़ी व असे फटाके जे मोठया प्रमाणात प्रदुषीत हवा, आवाज, घनकचरा तयार करतात अशा प्रकारचे तत्सम फटाके फोडण्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उडणारे दिवे / कंदील (FLYING LANTERNS) आदी उडविण्यास मनाई करण्यात आली आहे.हा आदेश दि 6 नोव्हेंबर 2026 ते 11 नोव्हेंबर 2026 पर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.
000000



