vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बावला पार्कमधील अतिक्रमणे हटवून मूलभूत सुविधा द्या!२२ वर्षांपासून सांडपाणी, दुर्गंधी आणि डासांच्या त्रासाने नागरिक हैराण;शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन

बावला पार्कमधील अतिक्रमणे हटवून मूलभूत सुविधा द्या!२२ वर्षांपासून सांडपाणी, दुर्गंधी आणि डासांच्या त्रासाने नागरिक हैराण;शिवसेनेचे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन

जालना,(प्रतिनिधी)- शहरालगतच्या चंदनझिरा येथील प्रभाग क्रमांक १२मधील बावला पार्क परिसरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्षवेधण्यात आले असून, या भागातील अतिक्रमणे हटवून सांडपाणी व्यवस्थापन,भूमिगत ड्रेनेज आणि पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन यांसह मूलभूत सुविधाउपलब्ध करून देण्याची मागणी परिसरातील नागरिकांना सोबत शिवसेना (उध्दवबाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांच्यानेतृत्वाखाली जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, शहरप्रमुख दीपक रणनवरे,संदीप झारकंडे, अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख वसीम पठाण, शहरप्रमुख शेखफेरोज, अमित यादव, सकावत खॉन, रईस शेख, जावेद शेख, तुकाराम भुतेकर, अफसरशेख, सय्यद सलीम, शेख बाबा आदींची उपस्थिती होती. यावेळी निवेदनत म्हटलेआहे की, बावला पार्क परिसरात मागील तब्बल २२ वर्षांपासून सांडपाण्याचाप्रश्न कायम आहे. परिसरात सांडपाणी साचत असल्याने डासांचा प्रादुर्भावमोठ्या प्रमाणात वाढला असून, नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या

आजारांचा धोका निर्माण झाला आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरातदुर्गंधी पसरत असून, नागरिकांना आरोग्याच्या समस्यांसह मोठ्या गैरसोयींचासामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठीजिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळपाहणी करावी, सांडपाण्याचा योग्य निचराहोण्यासाठी भूमिगत ड्रेनेज व्यवस्था निर्माण करावी तसेच पिण्याच्या

पाण्यासाठी भूमिगत पाइपलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.याशिवाय प्रभाग क्रमांक १२ मधील रस्त्यांवर तसेच रस्त्यांच्या कडेलाकरण्यात आलेली अतिक्रमणे हटवून नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी रस्तेमोकळे करावेत आणि रस्त्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशीही मागणीनिवेदनात करण्यात आली आहे.

स्थानिक बेरोजगारांना रोजगाराची संधी द्या- जिल्हाप्रमुख श्रीवास्तवदरम्यान, जालना औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक सुशिक्षित बेरोजगारयुवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दाही निवेदनातूनउपस्थित करण्यात आला आहे. जालना शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्यासंख्येने सुशिक्षित बेरोजगार युवक आहेत. मात्र, औद्योगिक वसाहतीतील विविध

उद्योगांमध्ये परप्रांतीय मजुरांना मोठ्या प्रमाणात काम दिले जातअसल्याने स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागतअसल्याची भावना जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांनी निवेदनात व्यक्तकेली. स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करूनदेण्यासाठी प्रशासनाने संबंधित उद्योग व्यवस्थापनाला आवश्यक सूचनाद्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

००००००००००फोटो ओळी……१-अतिक्रमणे हटवून सांडपाणी व्यवस्थापन, भूमिगत ड्रेनेज आणि पिण्याच्यापाण्याची पाइपलाइन यांसह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीशिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांकडेनिवेदनाद्वारे केली आहे.

००००००००

संबंधित पोस्ट

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

vishwatmaklokswamivarta

मुंबईत रेबीज निर्मूलन प्रकल्प- दुसरा टप्पा चा शुभारंभ मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या शुभ हस्ते…

vishwatmaklokswamivarta

उद्योगांच्या सामाजिक उपक्रमांचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• कृषी, आरोग्य, महिला सक्षमीकरण क्षेत्रात गोदरेज इंडस्ट्रीज करणार २५ कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक

vishwatmaklokswamivarta

दक्षिण भारतात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता- हवामान खात्याचा अंदाज

जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग, लाभार्थ्यांशी संवाद आणि व्यापक प्रसिद्धीवर भर

vishwatmaklokswamivarta