vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीआरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक संपन्न

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीआरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा  – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक संपन्न

        सांगली प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहत जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री सदाभाऊ खोत, डॉ. सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, सत्यजित देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महापालिका आयुक्त संजीता महापात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव तसेच आटपाडी पंचायत समितीचे सभापती दत्तात्र्ये पाटील, कडेगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. जितेश कदम, तासगाव पंचायत समिती सभापती अरूणा पाटील, कवठेमहांकाळ पंचायत समिती सभापती सिंधुताई पाटील, वाळवा पंचायत समिती सभापती उदयसिंह पाटील यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जास्तीत जास्त रूग्ण शासकीय रूग्णालयात उपचारासाठी कसे येतील ते पहावे. या माध्यमातून उपचाराचा परताव्याचा केंद्र व राज्य शासनाचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून सदरचा निधी त्या त्या रूग्णालयाच्या आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी वापरता येईल. आरोग्य विभागाकडील रिक्त पदावर कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. त्याप्रमाणे ते कार्यवाही करीत आहेत. आरोग्य यंत्रणेने त्यांच्याकडील टेस्टींग लॅब अधिक बळकट कराव्यात, प्रशिक्षीत कर्मचारी नेमून अचूक निदान होईल यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी वेळोवेळी आढावा घेण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर बैठकीत मान्यवरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

       यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह पंचायत समितीचे सभापती यांनी आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी विविध सूचना मांडल्या. ईश्वरपूर येथील शासकीय रूग्णालयात ट्रॉमा सेंटर व सिटी स्कॅन मशिन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार सत्यजित देशमुख यांनी केली. त्याचबरोबर आरोग्य संस्थामध्ये निदान लॅब, स्वच्छता, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आदी सूचना मान्यवरांनी मांडल्या.

      प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी तालुका, महानगरपालिका व जिल्हास्तरावरील समितीची रचना, कार्ये याबाबाबत सविस्तर सादरीकरण केले. तसेच आरोग्य व्यवस्था बळकटीकरणासाठी आत्तापर्यंत करण्यात आलेली कार्यवाही व पुढील नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

0000

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागात हुंडामुक्तीचा विचार रूजवण्यात अंगणवाडी सेविकांचे योगदान- जिल्हाधिकारी अशोक काकडे-हुंडामुक्ती अभियानांतर्गत 39 अंगणवाडी सेविकांचा सत्कार

लेख : पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व- सनातन संस्था–पितृपक्ष : २७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२६ पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूतील चेन्नई इथे 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा-शिवरायांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श घेऊन शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावीसाठी कर्मचाऱ्यांनी कटिबद्ध राहावे- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

बाल गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मांडणार;बालकांचा गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी