vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

डीपीसीतून पोलीस दलासाठी प्राप्त 27 वाहनांचेपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

डीपीसीतून पोलीस दलासाठी प्राप्त 27 वाहनांचेपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

सांगली, प्रतिनिधी) : जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलास प्राप्त २७ वाहनांचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदिंसह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस दलासाठी वाहने, अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने, पोलीस ठाण्यांसाठी इमारती अशा विविध माध्यमातून पोलीस दलाला बळकटीकरण करण्यात येत आहे. अशा उपाययोजनांतून गुन्हेगारांवर वचक बसून कायदा व सुव्यवस्था हाताळण्यासाठी मदत होणार आहे, असे ते म्हणाले.जिल्हा वार्षिक योजने योजनेतून पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे, वाहतूक व्यवस्थेचे बळकटीकरण करणे, अंतर्गत ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सन २०२६-२७ च्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 3,19,62,543/- रूपये इतक्या किमतीची एकूण २७ वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत. त्यामध्ये एक्सयुव्ही ७ एक्सओ – ०२, स्कॉर्पिओ – ०५, बोलेरो – १४, ट्रॅक्स तुफान – ०५, आयशर ट्रक – ०१ अशी वाहने मा. पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडून सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त झालेली आहेत.सदर वाहनांचा आपत्कालिन परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करण्यास उपयोग होणार असून पोलीस दलास कायदा व सुव्यवस्था तसेच सर्व सामान्य नागरिकांची सुरक्षा इत्यादी करिता प्रभावीपणे कामगिरी करण्यात या वाहनांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

 

संबंधित पोस्ट

हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटी रुपयांची विकास कामे होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-सिंहस्थ कुंभमेळा अविस्मरणीय करण्याची मुख्यमंत्र्यांची अखिल भारतीय संत समितीच्या बैठकीत ग्वाही…

💐☘️*धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा* ☘️💐आज उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण करणारा सण *रंगपंचमी* !

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द महिन्याभरात नवीन नियुक्त्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुक्तीभूमीचा विचार प्रेरणादायी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मुक्तीभूमीवर नतमस्तक होत केले अभिवादन

vishwatmaklokswamivarta

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta