vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व ‘आयर्नमॅन’ कैलास झोळगे यांना ‘विश्वकर्मा पुरस्कार’ प्रदानअप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते गौरव; प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीयर्स असोसिएशनचा उपक्रम

क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व ‘आयर्नमॅन’ कैलास झोळगे यांना ‘विश्वकर्मा पुरस्कार’ प्रदानअप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते गौरव; प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीयर्स असोसिएशनचा उपक्रम

जालना: प्रतिनिधी

क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे जालना जिल्ह्याचे सुपुत्र, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, आंतरराष्ट्रीय जलतरणपटू, उत्कृष्ट प्रशिक्षक, अल्ट्रा सायकलिस्ट तथा ‘आयर्नमॅन’ श्री. कैलास गजाननराव झोळगे यांना क्रीडा क्षेत्रातील अति उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीयर्स असोसिएशनतर्फे या वर्षीचा प्रतिष्ठित ‘विश्वकर्मा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

एका भव्य आणि दिमाखदार सोहळ्यात अप्पर जिल्हाधिकारी श्री. रमेशजी मिसाळ यांच्या शुभहस्ते कैलास झोळगे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.अथक परिश्रम आणि अष्टपैलू क्रीडाप्रवासाची दखल

 

 *जलतरणपटू, जालन्याचे पहिले फुल आयर्न मॅन, लोहपुरुष,अल्ट्रा सायकलिस्ट, समुद्र वीर, 81किलोमीटर ओपन वॉटर स्विमर,जलतरण प्रशिक्षक, प्रेरणादायी अष्टपैलू खेळाडू व*

*क्रीडा क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्व आहे*. #*खेळातील विक्रमी कामगिरी*#1) 5 ऑक्टोबर 2025 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या *लोहपुरुष* हाफ आयर्न मॅन स्पर्धेत 1.8 किमी स्विमिंग+ 90 किमी सायकलिंग+21 किमी रनिंग असे एकापाठोपाठ एक 113 किमी चे अंतर केवळ *7 (सात)* तासांमध्ये पूर्ण करून *लोहपुरुष* किताब पटकावला.

2) 5 जानेवारी 2026 रोजी गुजरात येथील पोरबंदर राष्ट्रीय समुद्र Sea स्विमिंग कॉम्पिटिशन मध्ये 15 किमी अंतर पार करून उपविजेतेपद पटकावत *समुद्र वीर* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

3) *जालन्याचे पहिले आयर्न मॅन* 10 मे 2026 रोजी व्हिएतनाम दानांग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयर्न मॅन स्पर्धेत 3.8 किमी स्विमिंग +180किमी सायकलिंग +42.2 किमी रनिंग असे सलग एकापाठोपाठ एक एकूण 226 किलोमीटर अंतर केवळ *15 (पंधरा)* तासांमध्ये पूर्ण केले व *फुल आयर्न मॅन* किताब पटकावला. 4) 26 जून 2026 रोजी फ्रान्स च्या एडॉक्स क्लब आयोजित 600 किमी BRM सायकलिंग स्पर्धेत छ. संभाजीनगर-बीड- तुळजापूरऊन परत – बीड -छत्रपती संभाजी नगर- अजंठा – वेरूळ – छत्रपती संभाजीनगर असे एकूण 600 km सायकलिंग फक्त *33 (तेहेतीस)* तासात पूर्ण करून फर्स्ट पोडियम फिनिशर्स *BRM किताबाने* सन्मानित करण्यात आले.5) 8 व 9 ऑगस्ट रोजी स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (SFI) यांच्या वतीने छत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी पुणे, राष्ट्रीय जलतरण स्पर्धा निवड चाचणी साठी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत 3 स्वर्ण ,1 रजत व 1 कांस्य पदक पटकावले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र.6) 16 ऑगस्ट 2026 रोजी फ्रान्स च्या एडॉक्स क्लब आयोजित 300 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत केवळ *13(तेरा)* तासामध्ये अंतर पूर्ण करून *फर्स्ट पोडियम फिनिशर्स BRM किताब पटकावला* .

7) 6 सप्टेंबर 2026 रोजी वेस्ट बेंगाल येथे स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) व मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशन यांच्या वतीने आयोजित जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या 81 की मी जलतरण स्पर्धेमध्ये मुर्शिदाबाद येथील एहरण घाट, जानिंगपूर ते गोरबजार सदर घाट, बेहरामपूर असे एकूण 81 किमी चे अंतर सतत पोहून केवळ *12.30( साडेबारा) तासांमध्ये पूर्ण केले.*

8) 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मास्टर्स आशियाई स्विमिंग स्पर्धेसाठी निवड चाचणी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा हरियाणा येथील बहादुरगड येथे आयोजित करण्यात आल्या त्यामधे 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात *रजत पदक* व 100 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात *कांस्य पदक* पटकावले व *आशियाई स्विमिंग चॅम्पियन साठी निवड करण्यात आली. व *भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पूर्ण झाले.*

श्री. कैलास झोळगे यांनी केवळ जलतरण क्षेत्रातच नव्हे, तर जगभरात अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ‘आयर्नमॅन’ स्पर्धा आणि अल्ट्रा सायकलिंगमध्येही जलतरण भारताचे नेतृत्व केले आहे. खेळाडू म्हणून यश मिळवल्यानंतर त्यांनी थांबून न राहता प्रशिक्षकाच्या भूमिकेतून शेकडो नवोदित खेळाडूंना घडवण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे. त्यांच्या या खडतर क्रीडाप्रवासाची, सामाजिक बांधीलकीची आणि क्रीडा जगतातील भरीव योगदानाची दखल घेऊन प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीयर्स असोसिएशनने त्यांची या पुरस्कारासाठी एकमुखाने निवड केली.क्रीडापटूंसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व: अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळपुरस्कार वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना अप्पर जिल्हाधिकारी श्री. रमेशजी मिसाळ म्हणाले, “आयर्नमॅन किंवा अल्ट्रा सायकलिंगसारख्या स्पर्धा जिंकण्यासाठी केवळ शारीरिक ताकद नाही, तर प्रचंड मानसिक खंबीरता आणि शिस्त लागते. कैलास झोळगे यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात दाखवलेले हे सातत्य आणि मेहनत आजच्या तरुण पिढीसाठी व उगवत्या क्रीडापटूंसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.”

सत्काराला उत्तर आणि आभार,पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्री. कैलास झोळगे अत्यंत भावूक झाले. ते म्हणाले, “प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीयर्स असोसिएशनसारख्या प्रतिष्ठित संस्थेने माझ्या क्रीडा प्रवासाची दखल घेऊन दिलेला हा ‘विश्वकर्मा पुरस्कार’ माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. हा सन्मान म्हणजे माझ्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप असून यामुळे मला क्रीडा क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची आणि नवीन खेळाडू घडवण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे. हा पुरस्कार मी माझ्या चाहत्यांना समर्पित करतो.

मान्यवरांची उपस्थिती व अभिनंदनाचा वर्षावया सोहळ्यास प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट अँड इंजिनीयर्स असोसिएशनचे श्री विनोदजी यादव ,संजयजी चौधरी यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, नामांकित आर्किटेक्ट्स, इंजिनीयर्स, विविध क्षेत्रांतील मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रातील या सर्वोच्च सन्मानाबद्दल श्री. कैलास झोळगे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

00000

संबंधित पोस्ट

बारावी जीवशास्त्रची परीक्षा जिल्ह्यातील 109 परीक्षा केंद्रावर सुरळीत : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले· कंधार तालुक्यात पानभोसी केंद्रावर पेपर संपेपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती· जिल्ह्यात 98.24 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती  जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांच्या भरारी पथकामार्फत निगरानी…

लोकं नाही तर गडचिरोलीचा विकास धावत आहे – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल**गडचिरोली महामॅरेथॉनमध्ये १४ हजार नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग*

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढवणे गरजेचे – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई

हुमणी अळी नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन – पालकमंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही

vishwatmaklokswamivarta

बालगृहातील प्रवेशितांचा जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सवाचे-9 ते 11 जानेवारी कालावधीत आयोजन..