vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीठळक बातम्या

भारताचा 100वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनल्याबद्दल पंतप्रधानांकडून अनुज श्रीवास्तव यांचे अभिनंदन

भारताचा 100वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनल्याबद्दल पंतप्रधानांकडून अनुज श्रीवास्तव यांचे अभिनंदन

नवी दिल्ली प्रतिनिधी-अनुज श्रीवास्तव यांनी प्रतिष्ठित ग्रँडमास्टर खिताब पटकावल्यानंतर भारताने बुद्धिबळ ग्रँडमास्टरचे शतक पूर्ण केल्याच्या ऐतिहासिक कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कौतुक केले.

ही असाधारण कामगिरी असल्याचे सांगत पंतप्रधानांनी भारताचा 100वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनल्याबद्दल अनुज श्रीवास्तव यांचे अभिनंदन केले. ही एक विलक्षण कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताने 100 ग्रँडमास्टरचा टप्पा गाठणे हा एक उल्लेखनीय मैलाचा दगड असून, तो देशातील खेळाडूंची अफाट प्रतिभा, समर्पण आणि कठोर परिश्रम तसेच युवकांमध्ये बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता दर्शवतो, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या विविध भागांतून उदयास येणारे तरुण बुद्धिबळपटू जागतिक स्तरावर आपली छाप पाडत असल्याचे पाहून आनंद होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या कामगिरीमुळे आणखी अनेक तरुणांना बुद्धिबळ खेळण्याची आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पुढील संदेश सामायिक केला :“भारताने बुद्धिबळात शतक पूर्ण केले आहे!असाधारण कामगिरी आहे, नाही का?आता भारतात 100 बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहेत!भारताचा 100वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनल्याबद्दल अनुज श्रीवास्तव यांचे अभिनंदन! ही खरोखरच किती विलक्षण कामगिरी आहे!

भारताने 100 ग्रँडमास्टरचा टप्पा गाठणे हा एक उल्लेखनीय मैलाचा दगड आहे. यातून आपल्या खेळाडूंची अफाट प्रतिभा, समर्पण आणि कठोर परिश्रम तसेच आपल्या युवकांमध्ये बुद्धिबळाची वाढती लोकप्रियता दिसून येते.देशाच्या विविध भागांतून उदयास येणारे तरुण बुद्धिबळपटू जागतिक स्तरावर आपली छाप पाडत असल्याचे पाहणे विशेष आनंददायी आहे.या कामगिरीमुळे आणखी अनेक तरुणांना बुद्धिबळ खेळण्याची आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेण्याची प्रेरणा मिळो.”

संबंधित पोस्ट

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी. डी. एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे – राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत आढावा बैठक

शाळांसाठीच्या निधीचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेत दिसला पाहिजे – शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर,आदर्श व पीएम श्री शाळांच्या कामांचे मूल्यमापन करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश२० पर्यंत पटसंख्या असलेल्या ६४२ शाळांची कारणमीमांसा करून कृती आराखडा तयार करागडचिरोलीतील किमान १०० विद्यार्थ्यांच्या ‘इस्रो’ अभ्यासभेटीचे नियोजन करा

ऑनर्स’ व ‘ऑनर्स विथ रिसर्च’ अभ्यासक्रमासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक आणि प्राध्यापकांसाठी प्रशिक्षण अनिवार्य

अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित ४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी मंजूर-पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात निधीचे वितरण 

vishwatmaklokswamivarta

महाचतुर एआय चॅटबॉटमुळे’ कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणिमार्गदर्शन एकाच व्यासपीठावर मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• डाटा सुरक्षिततेसाठी ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थासोबत सामंजस्य करार

श्री तुळजाभवानी देवीचे सोने वितळवण्यास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारलेली असतांनाही प्रशासनाचा अट्टाहास कशासाठी*धाराशिवचे जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य सचिव व गृह सचिव यांना बजावली ‘न्यायालयाच्या अवमाननेची नोटीस’*

vishwatmaklokswamivarta