vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वयो सन्मान राष्ट्रीय अभियानातंर्गत वयो साथी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

वयो सन्मान राष्ट्रीय अभियानातंर्गत वयो साथी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

नवी दिल्ली प्रतिनिधी-केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना वयो साथी उपक्रमांतर्गत स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम अटल वयो अभ्युदय योजने अंतर्गत नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या वयो सन्मान राष्ट्रीय अभियान – म्हणजेच विविध पिढ्यांमधील बंध दृढ करणाऱ्या एका राष्ट्रीय मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थी, तरुण व्यावसायिक आणि सामाजिक स्वयंसेवकांसह सर्व नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सामाजिक समावेशासाठी योगदान देण्याची संधी मिळणार आहे.

वयो साथी या नावाचा अर्थ सपोर्ट अर्थात आधार, अवेअरनेस अर्थात जागरूकता, असिस्टन्स अर्थात सहाय्य, ट्रेनिंग अर्थात प्रशिक्षण, हेल्थ अर्थात आरोग्य आणि इन्क्लुजन अर्थात समावेश असा आहे. या उपक्रमांतर्गत, नोंदणीकृत स्वयंसेवक ज्येष्ठ नागरिकांसाठी मित्र, मार्गदर्शक आणि दुवा म्हणून काम करतील, ज्यामुळे त्यांच्या सामाजिक समावेशाला आणि सर्वांगीण कल्याणाला चालना मिळेल. सहभागाची पोचपावती म्हणून स्वयंसेवकांना वयो साथी प्रमाणपत्रही दिले जाईल.

मंत्रालयाने सर्व पात्र नागरिकांना वयो साथी स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आणि एक सर्वसमावेशक समाज घडवण्यासाठी आपला वेळ, कौशल्ये व श्रम देण्याचे आवाहन केले आहे, जिथे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आदर केला जाईल, त्यांना महत्त्व दिले जाईल आणि आवश्यक आधार दिला जाईल.

मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जे नागरिक या उपक्रमात सामील होऊ इच्छितात, ते सीनिअर सिटीझन्स वेल्फेअर – सिंगल ॲक्सेस मेकॅनिझम फॉर ऑल व्हर्टिकल्स ऑफ एम्पॉवरमेंट अँड सोशल हार्मनी समावेश म्हणजे एसएएमएव्हीईएसएच या पोर्टलवर https://seniorcitizen.dosje.gov.in/vayo-sathi जाऊन नोंदणी करू शकतात. याद्वारे ते विविध पिढ्यांमधील संबंध दृढ करण्याच्या आणि समाजात ज्येष्ठ नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या राष्ट्रीय प्रयत्नांचा भाग बनू शकतात.

इच्छुक नागरिक वयो साथी स्वयंसेवक नोंदणी सुविधेद्वारे किंवा जीवन – जाँईट इलडरली एमपॉवरमेंट एन्ड वर्चुयल असिस्टंस नेटवर्क या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे नोंदणी करून या उपक्रमात सहभागी होऊ शकतात

अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम स्वयंसेवकांना ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल सेवा मिळवून देण्यात, कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आणि सामुदायिक आधार मिळवून देण्यात मदत करण्यास प्रोत्साहित करतो. तसेच, याचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे, सायबर फसवणुकीबाबत जागरूकता निर्माण करणे, आरोग्य व कल्याणास प्रोत्साहन देणे आणि त्यांचा सामाजिक सहभाग अधिक व्यापक करणे हा आहे.

संबंधित पोस्ट

इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठीलातूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा…

vishwatmaklokswamivarta

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्याकडून अलिबाग तालुक्यातील शाळा व अंगणवाड्यांची पाहणी; कुपोषित बालकांना योजनांचा लाभ देण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पंढरपूर येथे माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांचे श्रीविठ्ठल-रुक्मिणी दर्शन; राज्यात भरपूर पावसासाठी केली प्रार्थना…

बालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा*सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव*बालकांनी संकटसमयी 112 व 1098 क्रमांकावर संपर्क साधावा*पालक, शिक्षक व पोलीसांपासून कोणतेही सिक्रेट लपवू नका*• *”लोकसंवाद” कार्यक्रमाद्वारे कायदा व सुव्यवस्थेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*

vishwatmaklokswamivarta

बोले तैसा चाले…!अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा१३३ कोटींच्या भव्य स्मारकास मंजुरी; डॉ. संजय लाखेपाटील यांच्या पाठपुराव्याला यश..

राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजना मिशन मोडवर कार्यान्वित करावी-आरोग्य योजनांच्या निधीच्या माध्यमातून सरकारी रुग्णालयांचे सक्षमीकरण व्हावे- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर