vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यस्थानिक बातम्या

आयुष्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी:उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा बडग

आयुष्मान योजनेची प्रभावी अंमलबजावणी:उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाईचा बडग

ठाĹ प्रतिनिधी :- केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने आता अत्यंत आक्रमक आणि कठोर भूमिका घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे आणि विनामूल्य उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, योजनेचा लाभ देण्यास टाळाटाळ करणाऱ्या किंवा उपचारासाठी मज्जाव करणाऱ्या खासगी रुग्णालयांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिला आहे

     ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वाची संयुक्त आढावा बैठक पार पडली.

     या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार सुलभा गायकवाड, किरण भोईर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प       या बैठकीत रुग्णालयांसमोरील अडचणी, लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण तक्रारी तसेच योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींवर सखोल चर्चा करण्यात आली.

          शासकीय योजनांचे फलक दर्शनी भागात न लावणाऱ्या आणि आढावा बैठकीला कोणतीही पूर्वकल्पना न देता गैरहजर राहिलेल्या खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश डॉ. शेटे यांनी दिले असून, नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या अशा रुग्णालयांची देयके तात्काळ रोखण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेì         बैठकीदरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी काही मोठ्या रुग्णालयांकडून योजनेची माहिती देणारे फलक प्रमुख ठिकाणी लावले जात नसल्याचा मुद्दा अतिशय आक्रमकपणे उपस्थित केला. अनेक खासगी रुग्णालये आयुष्मान कार्डधारक रुग्णांना उपचारांसाठी प्राधान्य देत नसल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने आता संपूर्ण यंत्रणा ऑनलाइन आणि पारदर्शक केली असल्याचे स्पष्ट केले आहे.         मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते २६ फेब्रुवारी २०२६ रोजी शुभारंभ झालेल्या अत्याधुनिक ‘टीएमएस २.०’ (TMS 2.0) पोर्टलमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी विनाकारण नकार देणे किंवा क्लेम प्रक्रियेत गैरप्रकार करणे शक्य राहिलेले नाही, कारण प्रत्येक व्यवहाराची पारदर्शक नोंद होत आहे.

उपचारांच्या पूर्वमंजुरीसाठी प्रशासनाने केवळ सहा तासांची कालमर्यादा निश्चित केली असून, या ठराविक मुदतीत संबंधित क्लेम मंजूर किंवा नामंजूर न झाल्यास नियमानुसार त्याला स्वयंचलित मान्यता (Auto Approval) मिळण्याची पारदर्शक तरतूद करण्यात आली आहे.

     रुग्णालयांनी तांत्रिक प्रक्रिया आणि कागदपत्रपूर्ती वेळेत केल्यास निधी मिळण्यात कोणतीही अडचण येत नाही. दरम्यान, रुग्णालयांना क्लेमच्या रकमेपैकी केवळ २५ ते ३० टक्केच रक्कम मिळते, असा दावा काही घटकांकडून केला गेला असला, तरी अधिकाऱ्यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.         या सर्व कल्याणकारी योजनांच्या जनजागृतीबाबत ठाणे जिल्ह्याची सद्य:स्थिती पाहता, जिल्ह्यात एकूण ५६ लाख ९६ हजार आयुष्मान लाभार्थी आहेत; परंतु त्यापैकी केवळ १६ लाख ३७ हजार लाभार्थ्यांचीच कार्डे प्रत्यक्षात तयार झाली आहेत. याचा अर्थ ठाणे जिल्ह्यातील सुमारे ७० टक्के नागरिकांकडे अद्याप आयुष्मान कार्ड उपलब्ध नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाची प्रतीक्षा न करता स्वतःहून पुढाकार घेऊन आपले कार्ड लवकरात लवकर तयार करून घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहेकरण्llļ

नागरिकांना उपचारादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाने यंत्रणा अधिक सुलभ केली आहे. जर एखाद्या रुग्णालयाने उपचार नाकारले, अडवणूक केली अथवा कोणतेही गैरप्रकार निदर्शनास आले, तर नागरिकांना तातडीने तक्रार करता यावी यासाठी ऑनलाइन पोर्टल, रुग्णालयामधील ‘क्यूएसके’ (QSK) केंद्र आणि शासनाचा १८०० २३३ २२ ०० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच ‘आयुष्मान सारथी’ या विशेष व्हॉट्सॲप सुविधेच्या माध्यमातून घरबसल्या कार्ड काढण्याची प्रक्रिया पार पाडणे आणि आपल्या तक्रारी नोंदविणे आता अत्यंत सुलभ झाले असून, सर्वसामान्यांनी या डिजिटल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

या बैठकीत सुरुवातीस डॉ.प्रशांत पुंडकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आयुष्मान भारत मिशनचे जिल्ह्यात झालेल्या कामाचा अहवाल सादर केला. सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.

 

000000000

 

संबंधित पोस्ट

अटाळी येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न ;‘अधिक उपचार, कमी रेफरल’ संकल्पनेवर भर; आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर प्रशिक्षण

आरोग्य विभागाच्या क्रिकेट स्पर्धेत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती संघ ठरला अजिंक्य

कोटगल येथे पहिल्यांदाच भव्य ‘तान्हा पोळा उत्सव’ उत्साहात पार पडला; चि. ओम मुडके प्रथम!

vishwatmaklokswamivarta

भिवंडीत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचा मुद्देमाल जप्त

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे – उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे,कणगर येथे अचानक भेट देऊन कामाची केली पाहणी; सरपंचांचे गणनापत्र स्वतः समक्ष भरून घेतले

सोनाली वैद्य यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी प्रदान; नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विशेष सत्कार