vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एअर शो निमित्त सातारा शहरात वाहतुकीत बदल

एअर शो निमित्त सातारा शहरात वाहतुकीत बदल

सातारा प्रतिनिधी – सातारा सैनिक स्कूल शाळेच्या वतीने व भारतीय वायु सेनेच्या सहकार्याने भारतीय वायु सेनेची सुर्यकिरण एरोबॅटिक टिम साताऱ्यात दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी हवाई कसरती सादर करणार आहेत. या कार्यक्रमास सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी व्हीव्हीआयपी, व्हीआयपी तसेच संपूर्ण सातारा शहर व जिल्हयातून मोठ्या प्रमाणात शालेय विदयार्थी विदयार्थीनी, नागरीक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणेची शक्यता आहे. याकरिता सदर कार्यक्रमावेळी वाहतुकीस कोणताही अडथळा होवु नये म्हणुन वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.अ) वाहतुकीकरीता बंदी घालणेत आलेला मार्ग -दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजीचे सकाळी ०८.०० वा. पासुन ते दुपारी ०२.०० वा.पर्यंत खालील नमुद मार्गावर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंदी घालणेत येत आहे.१) पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट चौक व बॉम्बे रेस्टॉरट चौक ते पोवई नाका हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करणेत येत आहे.

२) गोडोली नाका, साईबाबा मंदिर मार्गे जिल्हा परिषद चौक येथे येणेस व जाणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.३) कनिष्क मंगल कार्यालय बाजुकडुन जिल्हा परिषद चौक येथे येणेस व जाणेस सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करणेत येत आहे.ब) वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग-१) बॉम्बे रेस्टॉरंट बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही अजंठा चौक, गोडोली नाका मार्गे पोवई नाका बाजुकडे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.२) वाढे फाटा बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही जुना आर.टी.ओ चौक-पारंगे चौक पोवई नाका मार्गे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.३) खेड चौक बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही सिव्हील हॉस्पीटल पोवई नाका मार्गे आत येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.४) मोळाचा ओढा बाजुकडुन सातारा शहरात प्रवेश करणारी सर्व प्रकारची वाहने ही भुविकास चौक – एसटी स्टेंड – पोवई नाका मार्गे येतील व त्याच मार्गाने बाहेर जातील.क) वरील सर्व मार्गावर रूग्णवाहिका पोलीस वाहने, अग्निशामक दलाची वाहने, इतर सरकारी वाहने वगळून इतर सर्व प्रकारच्या वाहनात वरील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

सेवा संकल्प अभियान अंतर्गत #लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘पीएम विश्वकर्मा योजना लाभार्थी’ मेळाव्यात पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पारंपरिक कारागिर व शिल्पकार बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना टूलकिट (साहित्य संच) तसेच कर्ज मंजुरी पत्रांचे वाटप

vishwatmaklokswamivarta

माओवाद विरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश-किमान तीन वर्षे सी-६० मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्ज तपासणीस 31 जुलै पर्यंत मुदतवाढ

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक १७ जुलैला स्टील हब’च्या दिशेने रोडमॅपसह उद्योगवाढ, रोजगार आणि नवउद्योजकतेवर होणार सविस्तर चर्चा,उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते अनावरण..