vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 सांगली, प्रतिनिधी : विविध आंदोलने, आगामी सण, उत्सव, जयंती, यात्रा, जत्रा, उरूस आदिच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि. 27 सप्टेंबर 2026 ते 11 ऑक्टोबर 2026 अखेर पर्यंत पुढील कृत्ये करण्यास मनाई केली असल्याचे आदेश जारी केले आहेत.

 या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे आणि तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे. तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

 हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही. हा आदेश दि 27 सप्टेंबर 2026 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 11 ऑक्टोबर 2026 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जारी केले आहेत.

00000

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना विशेष लेख केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन: शाश्वत आणि रसायनमुक्त शेतीकडे खंबीर पाऊल…

खारघर येथील हिंद दी चादर कार्यक्रमास देश-विदेशातून संत- महंत आणि भाविकांची उपस्थिती

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘वन्यवाणी वन्यजीव महोत्सव २०२६’ चा मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ

आय आय टी मुंबईतल्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी या संस्थेतले प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांची काल सुमारे १० तास चौकशी केली. 

महाशिवरात्री*15 फेब्रुवारी -2026*यंदाची महाशिवरात्री: भक्तीकडून मुक्तीकडे…”*का करावी महाशिवरात्रीला विशेष पूजा?*

vishwatmaklokswamivarta

पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील १३ वी अर्थव्यवस्था होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांचे उत्तर