vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

दोन दिवसीय CPHC प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न ; जवळखेड व जळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

दोन दिवसीय CPHC प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न ; जवळखेड व जळंब प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

 

बुलढाणा प्रतिनिधी: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने देऊळगाव राजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जवळखेड तसेच शेगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जळंब येथे १६ व १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) विषयावर दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निलेश जाधव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा नलावडे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र साळवे व डॉ. अभिलाष खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली.

या प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सेवक-सेविका, गटप्रवर्तक आणि आशा समन्वयक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. प्रशिक्षणादरम्यान सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा, समुदायस्तरीय आरोग्य व्यवस्थापन, आरोग्यविषयक जनजागृती, आदर्श गृहभेटीचे तंत्र तसेच आरोग्याच्या १३ सेवांबाबत सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेत पंचायत समिती देऊळगाव राजा गटविकास अधिकारी मुकेश माहोर, आणि सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. चौधर यांनी ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ स्पर्धेबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. शैलेश खंडारे, डॉ. संतोष सांगळे, डॉ. शिवानंद शिंगाडे, डॉ. सचिन खेडेकर, डॉ. जीवन भारती, डॉ. अंजली उजवणे, डॉ. पंकज राठोड, डॉ. मंगल राठोड, डॉ. सचिन भांगे, डॉ. मिलिंद बानखेडे, डॉ. सागर जाधव, डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह इतर तज्ज्ञांनी विविध आरोग्यविषयक विषयांवर मार्गदर्शन केले.

समुदायाच्या आरोग्यविषयक गरजा ओळखणे, प्रभावी गृहभेटीद्वारे नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवांना चालना देणे आणि आरोग्यविषयक जनजागृती अधिक प्रभावी करणे यावर या प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.

‘सुदृढ गाव, निरोगी समाज आणि प्रत्येक नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण प्राथमिक आरोग्यसेवा पोहोचविणे’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असून, आरोग्य यंत्रणेची क्षमता वाढविण्यासोबतच ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीस मदत होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी व्यक्त केला.

00000

संबंधित पोस्ट

शहापूर तालुक्यातील वाशाळा येथे १०३ गरोदर मातांना मोफत सुकामेवा वाटप प्रतीक्षा झावर फाउंडेशन आणि ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचा कुपोषण निर्मूलनासाठी स्तुत्य उपक्रम.

क्षयरुग्णांना पोषक आहार वाटप-निक्षय मित्र महानगर गॅस कंपनीचा सामाजिक पुढाकार

vishwatmaklokswamivarta

प्लास्टिकचा शेवट कुठे? पुनर्चक्रणाच्या पुढे एक प्रश्न

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन

उष्णतेच्या लाटांपासून संरक्षणासाठी* *राज्य शासनाकडून तीन व्यापक एसओपी जारी*

vishwatmaklokswamivarta

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियासंदर्भात जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप तयार करण्याचा निर्णय -डॉ. नीलम गोऱ्हे