vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

बुलढाणा जिल्ह्यात ‘सांस’ अभियानाला सुरुवात० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची होणार तपासणी; न्यूमोनियापासून संरक्षणासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

बुलढाणा जिल्ह्यात ‘सांस’ अभियानाला सुरुवात० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची होणार तपासणी; न्यूमोनियापासून संरक्षणासाठी आरोग्य विभागाचा पुढाकार

बुलढाणा, प्रतिनिधी: बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण कमी करून बालमृत्यू रोखण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत ‘सांस’ (SAANS) अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. १२ नोव्हेंबर २०२६ ते १२ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची तपासणी करण्यात येणार आहेया अभियानाद्वारे न्यूमोनियाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर उपचार याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. न्यूमोनिया हा लहान बालकांसाठी गंभीर आजार ठरू शकतो. श्वास घेण्यास त्रास होणे, छाती आत ओढली जाणे, जलद श्वास घेणे, ताप आणि खोकला ही न्यूमोनियाची प्रमुख लक्षणे आहेत. बालकांमध्ये अशी लक्षणे आढळल्यास घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेत दाखल करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर : अभियानांतर्गत बालकांचे नियमित लसीकरण, जन्मानंतर पहिले सहा महिने केवळ स्तनपान, सहा महिन्यांनंतर वयानुरूप पूरक आहार, हातांची स्वच्छता, घरातील स्वच्छता आणि धूरमुक्त वातावरणाचे महत्त्व पालकांना समजावून सांगण्यात येणार आहे. न्यूमोनियाचे वेळीच निदान आणि योग्य उपचार केल्यास बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व शहरी भाग व तालुक्यांमध्ये या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि क्षेत्रीय आरोग्य यंत्रणेमार्फत बालकांची तपासणी व जनजागृती उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे

बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने सजग राहावे. बालकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा व योग्य उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

रोहणा येथे सिकलसेल व कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती 🔴

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत…

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचे उत्साहात उद्घाटन

जिल्हा रुग्णालयाकडून ५५ मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

कुकशेत, नेरूळ परिसरात हिवताप-डेंग्यू प्रतिबंधात्मक जनजागृती दिंडी उत्साहात संपन्नआजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक काळजी घेणे महत्वाचे – महापौर श्रीम.सुजाता पाटील

गोटपॉक्स लसीकरणांतर्गत पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू