vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन**वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतासह सामुदायिक जमिनीवरही चारा लागवडीची कामे घेता येणार-रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले*

चारा टंचाईवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन**वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतासह सामुदायिक जमिनीवरही चारा लागवडीची कामे घेता येणार-रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले*

मुंबई, प्रतिनिधी- राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी हिरवा व कोरडा चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासह चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्र रोजगार हमी – विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार वैयक्तिक लाभार्थ्यांच्या शेतावर तसेच सार्वजनिक व सामुदायिक जमिनीवर चारा लागवडीची कामे हाती घेता येणार असून, सात प्रकारच्या अतिरिक्त चारा पिकांचा योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली.

सन २०२६ मध्ये पावसातील तूट, पावसाचे असमान वितरण, खरीप पिकांच्या उत्पादनात झालेली घट तसेच रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात संभाव्य घट यामुळे पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्धतेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चारा उत्पादनात वाढ करून पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होतेमंत्री गोगावले म्हणाले, या योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, लसूणघास (ल्युसर्न), ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट या चारा पिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पिकांच्या विविध सुधारित वाणांची लागवड करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वीच्या शासन निर्णयात नमूद चारा पिके आणि वैरणयुक्त वृक्षांच्या लागवडीसह आता या अतिरिक्त चारा पिकांची लागवडही अनुज्ञेय करण्यात आली आहे’व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत अनुज्ञेय ३७५ कामांमधील ‘उपजीविकेशी संबंधित पायाभूत सुविधा’ या वर्गात सामुदायिक उपयोगासाठी चारा लागवड आणि वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी चारा लागवड अशा दोन कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक शेतकरी तसेच सामुदायिक जमिनीवर चारा उत्पादनाची कामे घेणे शक्य होणार आहे. चारा लागवडीसाठी आवश्यक वाणांचे बियाणे महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको, भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) आदी संस्थांकडून उपलब्ध करून घेता येणार आहेत. प्रामुख्याने कमी पाण्यात येणारी, कमी कालावधीत उत्पादन देणारी आणि एकापेक्षा अधिक वेळा कापणी करता येणारी चारा पिके व त्यांचे वाण यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार, सिंचनाची शाश्वत उपलब्धता आणि पीक कालावधी विचारात घेऊन पशुसंवर्धन विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी योग्य वाणांची शिफारस करावी, असे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मंत्री गोगावले यांनी दिले.

या कामांची अंमलबजावणी पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायत या यंत्रणांमार्फत करण्यात येणार आहे. कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार संबंधित विभागांच्या निश्चित केलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. रोजगार हमी योजनेत मजुरांच्या श्रमांना प्राधान्य देणे अपेक्षित असल्याने मजुरांमार्फत करता येणाऱ्या कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर करता येणार नाही. तसेच, एकदा चारा लागवडीचे काम घेतलेल्या क्षेत्रावर त्याच योजनेतून पुन्हा चारा लागवडीचे काम अनुज्ञेय राहणार नाही. लाभार्थ्यांची निवड, कामांचे नियोजन, सामाजिक अंकेक्षण आणि योजनेतील विहित आर्थिक मर्यादांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. चारा लागवडीच्या कामांचे वेळोवेळी पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांच्या अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली असून यामुळे दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्धतेत वाढ करण्याबरोबरच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी यावेळी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत ६ एप्रिल रोजी*

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

अमरावती शहरात वाहतूक नियमांमध्ये अंशत: बदल पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र – पालकमंत्री मेघना बोर्डीकर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभ संपन्न

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७ प्रशिक्षण जनगणनेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवावा- जिल्हाधिकारी स्वामी

vishwatmaklokswamivarta

विनापरवाना ड्रोन उडवणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल – नागरिकांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन