vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कौशल्य, गुणवत्ता आणि गतिमानतेतून पाटणच्या विकासाला नवी दिशा**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर येथे पंचायत समितीच्या कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता कार्यक्रमाचा शुभारंभ*

*कौशल्य, गुणवत्ता आणि गतिमानतेतून पाटणच्या विकासाला नवी दिशा**पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत दौलतनगर येथे पंचायत समितीच्या कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता कार्यक्रमाचा शुभारंभ*

 

सातारा प्रतिनिधी : शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासकीय कामकाजात गुणवत्ता आणि पारदर्शकता आणण्याबरोबरच विकासकामांना अधिक गती देण्यासाठी पाटण पंचायत समितीच्या वतीने कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ आज दौलतनगर (मरळी) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.

पाटण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेने अधिक सक्षम, कार्यक्षम आणि लोकाभिमुख पद्धतीने काम करावे, असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, गतिमान प्रशासन कसे असते हे आपण पाटण तालुक्यात जनता दरबाराच्या माध्यमातून सिद्ध केले आहे. सरकारी अधिकारी हे लोकप्रतिनिधींप्रमाणेच जनतेचे सेवक आहेत. आपल्याला या उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान करायचे आहे. केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी न करता त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे, कामांचा दर्जा सुधारणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय वाढवणे यावर भर द्यावा तसेच सर्व विभागणी सामन्याने काम करून पंचायत समिती लोकाभिमुख करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री श्री देसाई यांनी केले.

या बैठकीस जिल्हा परिषद, सातारा येथील सर्व विभागांचे विभागप्रमुख, पंचायत समिती, पाटणच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम यांसह अन्य विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आरोग्य विभागातील अधिकारी, आरोग्य सेवक, आशा सेविका, शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक, पशुसंवर्धन विभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रशासकीय कामकाजात कौशल्यवृद्धी, सेवांचा दर्जा, योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि कामातील गतिमानता या बाबींवर बैठकीत विशेष चर्चा होणार आहे. विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन अडचणी समजून घेणे, त्यावर उपाययोजना निश्चित करणे आणि विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी समन्वित कार्यपद्धती विकसित करणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता वाढवून विकासकामांना गती देणे आणि शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवणे, या दृष्टीने पाटण तालुक्यातील हा कौशल्य, गुणवत्ता व गतिमानता कार्यक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया..

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त,मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत

राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी- अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक परिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार

पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक कार्यालयीन समित्यांनी अधिक सक्रिय व्हावेराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर

जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत आंबडवे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

vishwatmaklokswamivarta