vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षणातूनच घडते परिवर्तन पुस्तकांच्या माध्यमातून समाजात क्रांतीची बीजे रुजतात -श्री निलेश भगवान सांबरे-मालगुंड, ओरी आणि चिंद्रवली (कोंडवी) येथे गाव संवाद बैठकींच्या माध्यमातून ग्रामस्थांशी साधला संवाद

शिक्षणातूनच घडते परिवर्तन पुस्तकांच्या माध्यमातून समाजात क्रांतीची बीजे रुजतात -श्री निलेश भगवान सांबरे-मालगुंड, ओरी आणि चिंद्रवली (कोंडवी) येथे गाव संवाद बैठकींच्या माध्यमातून ग्रामस्थांशी साधला संवाद

राज्य प्रतिनिधी-रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड, ओरी आणि चिंद्रवली (कोंडवी) येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. निलेश सांबरे यांनी गाव संवाद बैठकींच्या माध्यमातून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावातील शैक्षणिक, आरोग्यविषयक, सामाजिक आणि विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

या संवादादरम्यान काही स्थानिक राजकीय मंडळी गावातील काही लोकांच्या कानामागे जाऊन पुस्तकांचे वाटप करून काय परिवर्तन होणार, अशा प्रकारच्या चर्चा करत असल्याचे समोर आले. यावर भूमिका स्पष्ट करताना श्री. निलेश सांबरे म्हणाले की, समाजात परिवर्तन घडविण्याची सुरुवात शिक्षणातूनच होते. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. आज गरीब विद्यार्थ्याच्या हातात दिलेले एक पुस्तक उद्या त्याला अधिकारी, डॉक्टर किंवा इंजिनिअर बनवू शकते आणि संपूर्ण कुटुंबाचे भविष्य बदलू शकते. त्यामुळे पुस्तक वाटपाने काय होणार, असा प्रश्न विचारण्यापेक्षा शिक्षणामुळे एखाद्या विद्यार्थ्याचे आयुष्य कसे बदलू शकते, हे समजून घेणे गरजेचे आहे. आज हातात दिलेले पुस्तक उद्या एखाद्या घराचे नशीब बदलू शकते. शिक्षणातूनच क्रांती येते आणि शिक्षणातूनच सक्षम समाज घडतो, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप, शैक्षणिक सुविधा, अभ्यासिका, पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रे आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच आरोग्य क्षेत्रात मोफत मल्टिस्पेशालिटी रुग्णालये, आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका सेवा आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक जागृती या चारही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिजाऊ संस्थेचे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील. सक्षम कोकण घडविण्याचा संकल्प घेऊन शिक्षण आणि आरोग्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

संबंधित पोस्ट

नवतंत्रज्ञानाचा जबाबदारीने स्वीकार करताना पत्रकारांनी सत्य पडताळणी आणि संपादकीय जबाबदारी अबाधित राखावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई; डेंग्यू नियंत्रणासाठी खासगी रुग्णालयांना अहवाल व रॅपिड टेस्ट रिर्पोटिंग बंधनकारक : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्षपदी नुसरत जहा यांची नियृक्ती – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली अधिकृत घोषणा*

vishwatmaklokswamivarta

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल – मंत्री बाबासाहेब पाटील भोकरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

vishwatmaklokswamivarta