vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

खरोळा सोसायटीच्या विकासाच्या नव्या पर्वासाठी सज्ज; शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ…✌🏻🎉

खरोळा सोसायटीच्या विकासाच्या नव्या पर्वासाठी सज्ज; शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ…✌🏻🎉

राज्य प्रतिनिधी लातूर-विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., खरोळा सोसायटी निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर आज शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ नागरिकांच्या उत्स्फूर्त आणि मोठ्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. 😍

या प्रचार सभेला लाभलेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद हा केवळ उपस्थितीचा आकडा नसून, शेतकरी विकास पॅनलच्या विचारांवर, ध्येयधोरणांवर आणि परिवर्तनाच्या भूमिकेवर जनतेने दाखवलेला विश्वास आहे

आमचा संकल्प केवळ निवडणूक जिंकण्याचा नाही, तर संस्थेचा कारभार पारदर्शक, प्रामाणिक आणि शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा बनवण्याचा आहे. संस्थेचे उत्पन्न वाढवून शेतकरी बांधवांसाठी अधिकाधिक सुविधा, नवनवीन उपक्रम आणि विकासाच्या संधी निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे.

आजच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाने आमचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला आहे. मात्र, ही लढाई यशस्वी करण्यासाठी प्रत्येक सभासदाचा सक्रिय सहभाग आणि भक्कम साथ महत्त्वाची आहे. 🙇🏻‍♂️म्हणूनच, सर्व सभासद बंधू-भगिनींना मनापासून आवाहन आहे की, व्यक्तीपेक्षा विचारांना, आश्वासनांपेक्षा कृतीला आणि स्वार्थापेक्षा शेतकरीहिताला प्राधान्य द्या. 🤝आपले बहुमोल मत शेतकरी विकास पॅनलला देऊन सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा आणि खरोळा सोसायटीच्या विकासाची नवी दिशा ठरविण्यात सहभागी व्हा!धन्यवाद!✒️ शेतकरी विकास पॅनल, खरोळा

संबंधित पोस्ट

इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अनिवार्य; योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहन

दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मदतीचा एक दिवा लावण्याचे महापौर सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली-हिट अँड रन घटनेतील जखमींची विचारपूस..

vishwatmaklokswamivarta

नव्या मुंबईतील कोपरखैरणे येथील इमारतीचा स्लॅब कोसळला – समाजमंदिरात रहिवाशांची निवास व्यवस्था