vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं वर्षाला ७०० ब्रासपर्यंत माती उत्खननावर रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं वर्षाला ७०० ब्रासपर्यंत माती उत्खननावर रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

राज्य प्रतिनिधी

पारंपरिक कुंभार व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं वर्षाला ७०० ब्रासपर्यंत माती उत्खननावर रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही आज माहिती दिली.

 

या निर्णयानुसार गावातले तलाव, पाझर तलाव आणि शेतांमधला गाळ स्वखर्चानं काढून नेला तरी रॉयल्टी आकारली जाणार नाही. या सवलतींसाठी महाखनिज प्रणालीद्वारे अर्ज करता येईल. पात्र व्यक्तींना पाच वर्षांसाठी स्वतंत्र ओळखपत्र देण्यात येणार आहे. माती उत्खनन आणि वाहतुकीचे परवाने ऑनलाइन मिळतील, तसंच वाहतुकीसाठी विनामूल्य पास दिला जाईल. कुंभार व्यावसायिकांसाठी जिल्हास्तरावर एक खिडकी योजना आणि सरकारी जागांवर उत्पादन क्लस्टर उभारण्याचंही नियोजन आहे. तसंच औष्णिक वीज केंद्रांमधली राख सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संबंधित पोस्ट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती …

रेल्वेच्या अधिकृत कॅन्टीनमधून प्रवाशांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवा,कंत्राटदारावर तात्काळ कडक कारवाई करा खासदार नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रबंधकांना निवेदन..

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वैरण व्यवस्थापनावर भर मौजे सायाळ येथे वैरण विकास योजनेची मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाचे शानदार उद्घाटन मराठी भाषा जागतिक पातळीवर नेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणार -मुख्यमंत्री

प्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रलंबित प्रतिवेदन/ई-चालन संदर्भात लोकअदालत