vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सोमवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

सोमवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे प्रतिनिधी अलनिनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे दिनांक 31 ऑगस्ट 2027 पर्यत काटकसरीने, प्राधान्यक्रमाने व नियोजनबद्ध पध्दतीने व्यवस्थापन करुन पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता निश्चित करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आहे. संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारीच्या उपाययोजना व उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वितरित करण्यात येणाऱ्या पाण्याचे 10 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

            त्या अनुषंगाने स्टेम प्राधिकरण तसेच ठाणे महानगरपालिकेची स्वत:ची पाणीपुरवठा योजनेमार्फत होणारा पाणीपुरवठा सोमवार दिनांक 16/11/2026 रोजी सकाळी 9.00 वा. ते मंगळवार दि. 17/11/2026 रोजी सकाळी 9.00 पर्यंत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी , सिध्दांचल, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या भागात 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच यापुढे प्रत्येक सोमवारी सकाळी 9.00 ते मंगळवारी 9.00 असा 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.

            तरी सदर पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात महापालिकेतर्फे करण्यात आले आहे

संबंधित पोस्ट

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी..

वसतिगृहांसाठी सैनिकांच्या पाल्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू

vishwatmaklokswamivarta

खारघर, नवी मुंबई येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी स्थापित 26 समित्यांच्या कामकाजाचा विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ओवे मैदान, खारघर येथे आढावा घेतला.

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तकांचे दानवाचन चळवळीला बळकटी देण्यासाठी‘बुक बॅंक’ उपक्रम- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

डॉमिनोज पिझ्झा सेंटरमध्ये अवैध एलपीजी गॅस वापर उघड; चेंबूर–देवनार येथे दोन गुन्हे नोंद

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२५ मधील पिक नुकसानभरपाईसाठी,नांदेड जिल्ह्याला रु.८१३.९३ कोटी मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात …