vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ऊसतोड मजूरांच्या पालांवर बालसंजीवनी अभियान राबवण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश*बालकांची होणार विशेष तपासणी*

ऊसतोड मजूरांच्या पालांवर बालसंजीवनी अभियान राबवण्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे निर्देश*बालकांची होणार विशेष तपासणी*

परभणी, प्रतिनिधी : राज्यातील उसतोड मजूरांच्या बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिले आहेत. यासाठी आरोग्य विभागाचे बालसंजीवणी हे विशेष अभियान राबवले जाणार असून कारखाना परिसर, उस तोड शेती या ठिकाणी जावून बालकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

राज्यातील विविध भागातील साखर कारखाण्यांचे गाळप हंगाम सुरू झाले आहेत. उसतोड करण्यासाठी मजूर घराबाहेर पडले असून त्यांचे तात्पुरते विसावे कारखाना परिसर आणि शेत वस्त्यांवर तयार झाले आहेत. उसतोड मजूरांसोबत त्यांचे अल्पवयीन पाल्यही मोठ्या संख्येने असतात. या पाल्यांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा त्या त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता कमी असल्याने आरोग्यांकूर ही विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ( RBSK ) अंतर्गत स्थलांतरीत असलेल्या प्रत्येक बालकाची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. कुपोषण, रक्तक्षय, बालविकासातील विलंब, जन्मजात व्यंग, संसर्गजन्य आजार आदिंबाबत तपासण्या करून आवश्यक ते उपचार केले जातील. याकामी त्या त्या भागातील आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, संबंधित कारखाना व्यवस्थापन यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. यासाठी राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या याद्या तयार करणे, कामगारांच्या पालांचे – तात्पुरत्या वस्त्यांचे सर्वेक्षण करणे, याच ठिकाणी आवश्यक ते लसीकरण करणे आदिंबाबत राज्याच्या प्रधान सचिवांना मेघना बोर्डीकर यांनी लेखी निर्देश दिले आहेत. उसतोड मजुरांची फरफट थांबवणे हा उद्देश – राज्यमंत्री मेघना बोर्डीकर उसतोड करण्यासाठी मजूर अनेक दिवस घराबाहेर असतात. त्यांच्या सोबत असणाऱ्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर जाणे मजुरांना शक्य होत नाही. कामाच्या व्यापात मजूर त्याकडे लक्षही देवू शकत नाहीत. ही बाब ध्यानात घेवून ही विशेष मोहीम राबवली जात आहे. उसतोड मजूरांची पाल्याच्या आजारावेळी होणारी फरफट थांबवणे व त्यांच्या पाल्यांना सुदृढ आरोग्य प्रदान करणे, हा बालसंजीवणी मोहिमे मागचा मुख्य उद्देश असल्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

*-*-*-*-*-*

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र सरकार ची सर्वात मोठी कारवाई दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या ११४ PDF मासिकांवर बंदी घालत ती जप्त करण्याचे आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta

शिक्षण केवळ पदवीपुरते नव्हे, तर भाकरी आणि राष्ट्रभक्ती देणारे असावे!”  —शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मोबाईलवर गृहपाठ बंद, शाळांमध्ये एआय सेंटर्स चला शाळेत जाऊ या’ अभियानाद्वारे रायगडच्या शिक्षण क्षेत्रात नवे पर्व

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक वितरण व्यवस्थतेतील धान्याच्या काळाबाजारा,विरोधात मोठी संयूक्त कारवाई 250 क्विंटल धान्य जप्त

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी सकारात्मक चर्चेनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे

महास्ट्राईड अंतर्गत प्रोत्साहनात्मक निधीसाठी गुणवत्तापूर्ण कृती आराखडे तयार करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**कामगिरीआधारित निधी मिळविण्यावर भर; शासन निर्णयाचा अभ्यास करून नियोजन करण्याच्या सूचना*

अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न     महाराजस्व समाधान शिबिरास आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती  • 78 भिल्ल कुटुंबांना घराचे पट्टेचे वितरण