vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

 भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक उपक्रम पत्रकार परिषद

 भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक उपक्रम पत्रकार परिषद

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्यभर विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सप्ताहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनाही शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, विविध शासकीय सेवांचा लाभ सुलभ करणे तसेच त्यांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे,असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

 भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन आणि पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या संघर्षाचे स्मरण करण्यासाठी केंद्र शासनाने १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिन’ म्हणून घोषित केला आहे. आदिवासी स्वातंत्र्यवीरांचे योगदान, संस्कृती, परंपरा, इतिहास, भाषा आणि अस्मिता यांचे जतन व संवर्धन करून हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानिमित्त आठवडाभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती करुन देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

 प्रकल्प अधिकारी चेतना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, सहा. प्रकल्प अधिकारी डॉ. उद्धव वायाळ, निरीक्षक भागवत कदम, पी.एल.कायंदे, व्ही.एच. महिंद्रकर, महेशकुमार अंबुलगे आदी उपस्थित होते.

 पत्रकार परिषदेत माहिती देन्यात आली की, या सप्ताहास दि.११ पासून सुरुवात झाली असून दि. १२ पासून शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. दि.१३ रोजी पात्र लाभार्थ्यांना न्यूक्लियस बजेटअंतर्गत धनादेशांचे वितरण करण्यात येणार असून, धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनमन योजना आणि अन्य शासकीय योजनांचे लाभ दिले जाणार आहेत. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याबरोबरच स्वयंरोजगार, व्यवसाय, कृषिपूरक उद्योग, सिंचन आणि उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. दि.१४ रोजी आदिवासी स्मारके आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल करण्यात येणार आहे. सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करून आदिवासी देव-देवता, पूजापद्धती, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविण्यात येईल. दि.१५ रोजी गडचिरोली येथे देशस्तरीय मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. दि.१६ रोजी आदिवासी बांधवांसाठी विशेष सेवा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. १७ रोजी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. दि.१८ रोजी आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांनी सेवा सप्ताहाचा समारोप होणार आहे.  जिल्ह्यातही या कार्यक्रमांचे नियोजन याप्रमाणे करण्यात आले आहे.दि.१३ रोजी अंबड तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना धनादेश वितरण आणि अनुसूचित जमातीच्या विविध योजनांची माहिती दिली जाईल.  दि.१४ रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यातील आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचे सुशोभीकरण, वेरुळ येथे दीपोलोत्सव, तसेच जाफ्राबाद, शिवूर बंगला, चोकाळा व कन्नड येथील स्मारकांची स्वच्छता व सुशोभीकरण केले जाईल.

दि.१५ रोजी मुख्य शासकीय कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथे झाल्टा फाट्याजवळ अंबिका लॉन्स आडगाव फाटा येथे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितत व स्थानिक मंत्री, व स्थानिक खासदार, आमदार यांच्या उपस्थित मध्ये आदिवासीबांधव यांचा ‘क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती’ चा मुख्य शासकीय कार्यक्रम पार पडेल.दि.१६ रोजी शिरुर कासार येथे आधार कार्ड व इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांचे सेवा शिबीर आयोजित करण्यात आले आहे.दि.१७ सिल्लोड येथे लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळावा, आरोग्य तपासणी व पोषण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मंत्री, खासदार, आमदार तसेच जिल्हाधिकारी जालना, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित राहतील.

दि.१८ रोजी प्रकल्प कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे जनजागृती सप्ताहाचा अधिकृत समारोप होईल. जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा सर्वांगिण विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि आदिवासी अस्मिता व संस्कृतीचे जतन करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर कटिबद्ध आहे, असे प्रकल्प अधिकारी श्रीमती चेतना मोरे यांनी सांगितले.

०००००

संबंधित पोस्ट

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

नवी मुंबई महानगरपालिकला सीआयटीआय टेक्सटाईल सस्टेनेबिलिटी राष्ट्रीय पुरस्कार 2026 प्रदान…

भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी पोर्टलची निर्मिती

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना २०२६ चा ‘शिव सन्मान पुरस्कार जाहीर

vishwatmaklokswamivarta

कमी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये आणि शेत मजुरांना 25 हजार रुपये देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे

vishwatmaklokswamivarta

मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत कुस्ती व लॉन टेनिसविभागीय निवड चाचणी दि.२३ रोजी