vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रहेजा गार्डन आग दुर्घटनेत ५० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांना एक वेतनवाढ द्या खासदार नरेश म्हस्के यांची ठाणे महापालिका आयुक्तांकडे मागणी

रहेजा गार्डन आग दुर्घटनेत ५० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांना एक वेतनवाढ द्या खासदार नरेश म्हस्के यांची ठाणे महापालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे प्रतिनिधी – ठाण्यातील रहेजा गार्डन येथील कार्लाइन या १७ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत तब्बल ५० रहिवाशांचे प्राण वाचवणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या (TDRF) जवानांचा विशेष गौरव करण्यात यावा, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. या बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी आणि जवानांना प्रोत्साहनपर एक वेतनवाढ (इन्क्रिमेंट) देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास रहेजा गार्डन येथील कार्लाइन या १७ मजली इमारतीत भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रहिवाशांना धीर दिला. दरम्यान, इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने लिफ्टचा वापर करणे अशक्य झाले होते. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अग्निशमन दल आणि टीडीआरएफच्या जवानांनी शिड्या व स्ट्रेचरच्या साहाय्याने तब्बल ५० रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. विशेष म्हणजे, रहिवाशांसोबतच त्यांच्या पाळीव कुत्रे आणि मांजरांनाही जवानांनी सुखरूप बाहेर काढले.अनेक तास अथक परिश्रम घेत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत मोठी जीवितहानी टाळली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानांच्या शौर्याचे आणि कर्तव्यदक्षतेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घटनास्थळी कौतुक केले होते.

आपत्तीच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावून जाणाऱ्या या जवानांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या असामान्य कामगिरीची योग्य दखल घेऊन त्यांना एक वेतनवाढ देण्यात यावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे.

या निर्णयामुळे जवानांच्या कार्याचा सन्मान होण्यासोबतच भविष्यात आपत्ती व्यवस्थापनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि काम करण्याचा उत्साहही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

000000

संबंधित पोस्ट

उष्माघातापासून काळजी घेण्याचे नवी मुंबईकरांना आवाहन

विधानसभा प्रश्नोत्तरे- नो युवर डॉक्टर’ क्यूआर प्रणालीद्वारे डॉक्टरांची नोंदणी तपासता येणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन-पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड • विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम• चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान..

vishwatmaklokswamivarta

पुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादमान्यवरांच्या हस्ते शिबिरात विविध दाखले व प्रमाणपत्राचे वितरण..