vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ग्राम विकासातून विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार – ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदवावाअभियानाचे जिल्हा, विभागीय पुरस्कार प्रदान..

ग्राम विकासातून विकसित भारताचा संकल्प पूर्ण होणार – ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सहभाग नोंदवावाअभियानाचे जिल्हा, विभागीय पुरस्कार प्रदान..

अमरावती, प्रतिनिधी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून ग्राम विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. यातून गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली आहे.अभियानाच्या माध्यमातून माणसे एकमेकांशी जुळल्या गेली आहेत. गावाच्या विकासासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. अभियानाद्वारे निर्माण झालेल्या या सकारात्मकतेतून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे, त्यासाठी सर्व घटकांनी योगदान द्यावे, असे आवाहन ग्राम विकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

   मंत्री श्री.गोरे यांच्या हस्ते आज येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे जिल्हा व विभागस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण पोटे, संजय खोडके, राहुल कुल, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, गजानन लवटे, राजू तोडसाम, केवलराम काळे, सई डहाके, उमेश यावलकर, ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी आदी उपस्थित होते.        मंत्री श्री. गोरे म्हणाले, देशाला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र करण्यासाठी संकल्प करण्यात आला आहे. राज्यानेही विकसित महाराष्ट्राचा संकल्प करीत पुढाकार घेतला आहे. यादृष्टीने राज्यात मजबूत दळणवळण व्यवस्था उभी राहिली आहे. शहरातील पायाभूत व्यवस्था बळकट होत आहे. शहरांच्या विकासासोबतच गावांच्या विकासाच्या बळकटीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागाच्या विकासातून विकसित भारताचा संकल्प पूर्ण होण्याचा विश्वास दृढ झाला आहे.

    या अभियानात राज्यातील 5 हजार 644 गावांनी सहभाग घेतला. यातील 4 हजारहून अधिक ग्रामपंचायतींनी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करून सीसीटीव्ही यंत्रणा उभारली. या अभियानाचे फलीत म्हणून 815 कोटी रूपयांचे कर संकलन आणि 240 कोटींची पाणीपट्टी संकलित झाली आहे. तसेच 13 हजार पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण करून 65 लाख वृक्षलागवड करण्यात आली.    अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचे एकत्रिकरण करून ग्राम विकासाला चालना देण्यात येत आहे. यात आरोग्य, दिव्यांग विकास, विविध आवास योजना, भूमिहीनांना घरे, सीसीटीव्ही यंत्रणा, पाणंद रस्ते, गावातील रस्ते, स्मशानभूमी, व्यायाम शाळा, वाचनालय आदी सुविधा उभारण्यात आल्या आहे. प्रामुख्याने शाळांमध्ये मुलामुलींसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध झाली आहे. अभियान राबविण्यासाठी गावपातळीवरील सर्व घटकांचे योगदान महत्त्वाचे आहे. गावस्तरावर अभियान राबविताना प्रशासनावरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.गावाच्या कार्याचे मुल्यमापन होत असताना लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या कार्याचे मुल्यमापन होणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गाव दत्तक घ्यावे.गावात जाऊन लोकचळवळ उभारावी. राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे.त्यामुळे या परिस्थितीला संधी समजून या अभियानात जलसंधारणाची कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

     मंत्री श्री. गोरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान सन 2025-26 मध्ये विभागीय स्तरावर 1 कोटी रुपयांचा प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सावळी, ता. जि. बुलडाणा, 80 लाख रुपयांचा दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पार्डी, ता. मोर्शी, 60 लाख रुपयांचा तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या एरंडगाव, ता. नांदगाव खंडेश्वर, तर अमरावती जिल्हास्तरावरील 50 लाख रुपयांचा पहिला क्रमांक पटकावणाऱ्या घोडसगाव, ता. अंजनगाव सुर्जी, 30 लाख रुपयांचा दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या बेलोरा, ता. चांदुरबाजार आणि 20 लाख रुपयांचा तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या देवगाव, ता. अचलपूर या ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

   सुरुवातीला ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार आणि राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आणि यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज योजना 2026-27 च्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. जलताराचे संशोधक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलसंधारणाबद्दल मार्गदर्शन केले. अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी प्रास्ताविक केले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. अपर आयुक्त (विकास) शालिनी कडू यांनी आभार मानले.

जिल्हा परिषदांच्या प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद,       पुरस्कार सोहळ्या निमित्ताने कार्यक्रम स्थळाच्या परिसरात अमरावती विभागातील सर्व जिल्हा परिषदांतर्फे विशेष प्रदर्शन लावण्यात आले होते. यात उमेद, आरोग्य विभाग, पशूसंवर्धन, कृषी विभागाची दालने तसेच विविध बचत गटांची उत्पादने प्रदर्शित करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित मंत्री श्री. गोरे यांच्यासह उपस्थितांनी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली.

 

००००००

संबंधित पोस्ट

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावेजिल्ह्यातील मंडळांना ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला-सव्वा कोटीहून अधिकची आर्थिक उलाढाल    – पालकमंत्री शंभूराज देसाई

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा पारदर्शकता आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर;लाभार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध.

बॅंकांनी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज द्यावे — पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी १९, २०, २६ व २७ सप्टेंबरला विशेष शिबिरांचा लाभ घ्या**सातारा जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत बीएलओ राहणार उपस्थित**नवमतदारांसह पात्र नागरिकांना नाव नोंदणी, दुरुस्ती व वगळणीची संधी*

vishwatmaklokswamivarta