vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

चांदूर रेल्वेत दुष्काळ, पाणी टंचाई निवारणासाठीसमन्वय समितीची आढावा सभा संपन्न

चांदूर रेल्वेत दुष्काळ, पाणी टंचाई निवारणासाठीसमन्वय समितीची आढावा सभा संपन्न

अमरावती प्रतिनिधी : चांदूर रेल्वे उपविभागातील चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांमध्ये संभाव्य दुष्काळ व पाणी टंचाईच्या काळात ग्रामीण भागात पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरीय समन्वय समितीची आढावा सभा आज घेण्यात आली. आमदार प्रतापदादा अडसड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

या आढावा बैठकीत तिन्ही तालुक्यांतील विविध शासकीय विभागांच्या पूर्ण, प्रस्तावित आणि प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलसंधारण व पाणीपुरवठ्याच्या कामांमध्ये नाला खोलीकरण, विहिर खोलीकरण व पुनर्भरण, विहिर दुरुस्ती, रेन वॉटर हार्वेस्टींग, सार्वजनिक विहिर अधिग्रहण, खासगी विहिर सर्वेक्षण, शेततळे निर्मिती व खोलीकरण तसेच ठिबक आणि तुषार सिंचनाद्वारे पिकांना पाणीपुरवठा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कृषीसाठी वीज जोडणी, वीज फीडर दुरुस्ती व नवीन फीडर जोडणी, तसेच चारा निर्मिती आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता करण्यावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी, तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून नवीन पीक कर्ज वाटपाची सद्यस्थिती यावेळी जाणून घेण्यात आली.

याबाबत आमदार श्री. अडसड यांनी दुष्काळाच्या स्थितीमध्ये प्रस्तावित जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करावीत. जनावरांना चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी चारा लागवडीकरिता शेतकऱ्यांना वैरण बियाणे उपलब्ध करून द्यावे. पीक कर्जमाफी व नवीन पीक कर्जाचे प्रलंबित प्रस्ताव तसेच प्रलंबित फार्मर आयडी आणि ई-केवायसी तातडीने निकाली काढावीत, असे निर्देश दिले. तसेच नागरिकांनी त्यांच्या तक्रारी MLApratapadsad.com या ऑनलाईन पोर्टलवर दाखल कराव्यात, असे आवाहन केले

सभेला चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांतील तहसील कार्यालय, पंचायत समिती, कृषी, पाणीपुरवठा, जलसंधारण, वन, पशुसंवर्धन, सहायक निबंधक सहकारी संस्था, पाटबंधारे, नगर परिषद तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

00000

संबंधित पोस्ट

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कागल नगरीत विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळा व शेतकरी मेळावा

सैनिकी मुला-मुलींचे वसतीगृह, विश्रामगृह येथे कंत्राटी पदभरती

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी जिल्ह्यात ६९.९१ टक्के मतदान*

vishwatmaklokswamivarta

अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण सुरू

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची उपस्थिती

भारत आणि ब्राझील दरम्यान टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी