vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नागपूर-कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ परिसरात २७ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि महोत्सवाचे उद्घाटन

नागपूर-कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ परिसरात २७ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि महोत्सवाचे उद्घाटन

नागपूर प्रतिनिधी-कामठी येथील ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’ परिसरात २७ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘धम्मभूमी ड्रॅगन पॅलेस टेंपल’ या स्मरणिकेचे प्रकाशन तसेच विविध विकासकामांचा डिजिटल पद्धतीने शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

भगवान गौतम बुद्धांनी जगाला प्रज्ञा, करुणा आणि शील याचा संदेश दिला. त्यांच्या विचारांवर आधारित बौद्ध धम्म आज जगभर पोहोचला असून, जपानसह अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. भारत आणि जपान यांच्यात राजकीय संबंधांसोबतच सांस्कृतिक आणि वैचारिक नातेदेखील दृढ आहे. नागपूरची पवित्र दीक्षाभूमी आणि ‘ड्रॅगन पॅलेस टेम्पल’मुळे शहराला जागतिक स्तरावर बौद्ध धम्माचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून ओळख मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

नागपूरला दीक्षाभूमीची पवित्र परंपरा लाभली आहे. त्यासोबतच ड्रॅगन पॅलेस टेम्पलने नागपूरची ओळख जागतिक स्तरावर पोहोचविण्याचे कार्य केले आहे. ‘सेव्हन वंडर्स ऑफ लँड’ ही संकल्पना पुढे येत असून, यामुळे जगभरातील बौद्ध अनुयायी आणि पर्यटक नागपूरकडे आकर्षित होतील. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या नावाने स्थानिक परिसरातील मेट्रो स्थानकाला देण्यात आलेली ओळखही या स्थळाचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, इंटरनॅशनल निचिरेन-शू फेलोशिप असोसिएशनचे अध्यक्ष भंते कानसेन मोचिदा, टोकियो (जपान) येथील मिनोबुसान कुओंजी टेम्पलचे व्हेनेरेबल तायकेन आओयामा, बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या इंटरनॅशनल त्रिपिटक चँटिंग सेरेमनीच्या मुख्य संरक्षक वांगमो डिक्सी, आमदार डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार जोगेंद्र कवाडे, यांच्यासह जपान येथील बौद्ध भिक्षू संघाच्या प्रतिनिधींची विशेष उपस्थिती होती.

संबंधित पोस्ट

कर्जमुक्तीमुळे डोक्यावरील कर्जाचे ओझे उतरल्याच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना५ हजारांच्या अग्रीम मदतीने दिवाळीत मिळाला दिलासा 

vishwatmaklokswamivarta

अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठचे अलिबाग शहरात आयोजन नागरिकांनी सहकुटुंब भेट देऊन नव ऊद्योजकांना प्रोत्साहित करावे

vishwatmaklokswamivarta

बालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा*सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादव*बालकांनी संकटसमयी 112 व 1098 क्रमांकावर संपर्क साधावा*पालक, शिक्षक व पोलीसांपासून कोणतेही सिक्रेट लपवू नका*• *”लोकसंवाद” कार्यक्रमाद्वारे कायदा व सुव्यवस्थेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन*

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘राह-वीर’ रस्ते अपघातप्रसंगी मदत करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्यायोजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करण्याची अंतिम मुदत

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक -सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक! बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढा; प्रशासकीय अपयशाचा आंदोलकांकडून निषेध*