
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर थोर तेजस्वी व्यक्तिमत्त्वांना वाहिली आदरांजली…
नवी दिल्ली प्रतिनिधी-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समिती मधील सर्व महान व्यक्तिमत्त्वांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी संविधानाच्या रुपाने आपल्याला दिलेली देणगी हा भारतीय लोकशाहीचा अमूल्य वारसा असून विकसित भारताचा संकल्प साकारण्यात आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
संविधानात नमूद केलेल्या तत्वांना अधिक बळकट करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. या सुभाषितात विद्वानांनी सखोल विचारविनिमय करून सुस्पष्टपणे मांडलेली धोरणे आणि तत्त्वे चिरकाळ टिकून राहतात, असे म्हटले आहे.पंतप्रधानांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे:या मंगलप्रसंगी, मी पूजनीय बाबासाहेब आणि संविधान सभेतील सर्व थोर व्यक्तिमत्त्वांना वंदन करतो.
त्यांनी संविधानाच्या रूपात दिलेली देणगी हा भारतीय लोकशाहीचा एक अनमोल वारसा असून तो विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी आम्हाला सतत मार्गदर्शन करत राहील.संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा, संविधान निर्मात्यांचे स्मरण करण्याचा दिवस आणि त्यात दिलेल्या तत्त्वांना अधिक मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी यथार्थ क्षण.
बहुधा बहुभिः सार्धं चिन्तिताः सुनिरूपिताः।कथञ्चिन्न विलीयन्ते विद्वद्भिश्चिन्तिता नयाः॥”



