
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १६६ निष्पाप नागरिकांचे, त्यातल्या ६ अमेरिकी नागरिकांचेही स्मरण… केले
मुंबई प्रतिनिधी
भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १६६ निष्पाप नागरिकांचे, त्यातल्या ६ अमेरिकी नागरिकांचेही स्मरण केले
या वर्षाच्या सुरुवातीला ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील स्मृतिस्थळाला भेट देऊन, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यासह हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आणि भारताच्या सुरक्षा दलांच्या शौर्याला अभिवादन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादाविरोधातील लढ्यात अमेरिका भारताच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. दहशतवाद्यांना न्यायालयासमोर आणण्यासाठी दोन्ही देशांमधील कायदा अंमलबजावणी यंत्रणांमधील सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.



