भारतीय रेल्वेला ४५ व्या इंडिया इंटरनॅशनल २०२६ च्या ट्रेड फेअर मध्ये रौप्य पुरस्कार!
नवी दिल्ली प्रतिनिधी-नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित ४५ व्या इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर (IITF) २०२६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या दालनाला रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘विकास और विरासत’ ही या प्रदर्शनाची संकल्पना होती.
भारतीय रेल्वेच्या दालनात देशातील आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा, अत्याधुनिक अभियांत्रिकी, प्रवाशांसाठीच्या सुविधा आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत स्लीपर रेल्वेचे सादरीकरण करण्यात आले. नवोन्मेष, वारसा आणि जागतिक दर्जाची रेल्वे कनेक्टिव्हिटी यांसाठी भारतीय रेल्वेची बांधिलकी या प्रदर्शनातून अधोरेखित झाली.