vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिल येथील स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिल येथील स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमिल येथील स्मारकाचे काम २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासाठी कंत्राटदाराने सुधारित कालमर्यादेसह कामाचा आराखडा सादर करावा, तर एमएमआरडीएने कामाच्या प्रगतीवर दररोज देखरेख ठेवावी. सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामातील दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करत कामाला गती देण्याचे निर्देश दिले.

बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रकल्पाशी निगडित प्रतिनिधी उपस्थित होते.

कंत्राटातील अटींचे पालन करून काम पूर्ण करणे ही कंत्राटदाराची जबाबदारी असून, आर्थिक कारणांमुळे काम थांबविणे खपवून घेतले जाणार नाही. आवश्यकतेनुसार पर्यायी कंत्राटदाराची नियुक्ती आणि कठोर कारवाईचाही विचार करण्यात येईल. स्ट्रक्चरल स्टीलची उभारणी आणि ब्राँझ क्लॅडिंगची कामे समांतरपणे पूर्ण करताना स्मारकाची गुणवत्ता, सुरक्षितता आणि स्थैर्य याबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

स्मारकाचे सामाजिक महत्त्व लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले.यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, शापूरजी पालोनजी ॲन्ड कंपनी प्रा.लि. या समूहाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शशी प्रभू ॲन्ड असोसिएट्स वास्तू विशारदचे प्रकल्प सल्लागार तसेच ज्येष्ठ शिल्पकार अनिल सुतार उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात स्वच्छतेच्या बाबतीत अधिक व्यापक आणि प्रभावी मोहीम – अश्विनी भिडे

नविन रास्तभाव दुकानांसाठी अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे

नागरी प्रशासनाने लोकांचा विश्वास जिंकून ‘सुरक्षेची पोकळी’ भरून काढावी – मुख्य सचिव राजेश अग्रवाल नक्षलोत्तर परिवर्तनासंदर्भातील राज्यस्तरीय आढावा बैठक

नवी मुंबई प्रतिभावंतांचे शहर म्हणून उदयास येईल – नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी महापौर श्रीम. सुजाता पाटील यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta