
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करा-शिवसेना रस्त्यावर उतरेल -महिला आघाडी जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांची मागणी
जालना, प्रतिनिधी)-जालना जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी जालनाजिल्हा प्रशासन गंभीर नसून दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होत असलेली सक्तीची कर्ज वसुली न थांबल्यास शिवसेनारस्त्यावर उतरेल,असा इशारा शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यामहिला आघाडी जिल्हाप्रमुख रूपम घुगे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
त्यांच्या संभाजीनगरातील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतहोत्या. यावेळी माजी नगरसेवक गणेश घुगे, अंकुश राजे, बाबासाहेब पाखरे,तुळशीराम काळे, बाबुराव कायंदे, जर्नाधन गिराम, राजु फुलझाडे, पैâजलमिर्झा, शाहील पटेल, बबन गिराम, रितेश खराडे, महिला कार्यकर्त्या संगिताकोल्हे, पल्लवी चव्हाण आदींची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेत ,माहिती देतांना घुगे पुढे म्हणाल्या की,जालना जिल्ह्यात यंदा पावसाअभावीनिर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकविविध समस्यांना सामोरे जात आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत
असून जालना जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यातच टंचाईग्रस्त गावांना १३१टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ६७ मध्यम व लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती असून भूजल पातळीत सरासरी३.६९ मीटरने घट झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांना पाण्यासाठी भटकंतीकरावी लागत आहे. प्रत्येक टंचाईग्रस्त गावाला नियमित पाणीपुरवठा,टँकरच्या
फेर्यांवर नियंत्रण व पारदर्शकता असायला हवे. बंद पडलेल्या पाणीपुरवठायोजनांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. जालना जिल्ह्यातील दुष्काळीपरिस्थिती लक्षात घेता उन्हाळ्यापूर्वी गावनिहाय पाणी आराखडा जाहीरकरावा, अशी मागणीही घुगे यांनी यावेळी केली.दुष्काळी परिस्थितीत जालना जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात असून शेतीचाखर्च भागवणे कठीण झाले आहे. जालना जिल्ह्यासाठी विशेष दुष्काळ निवारणपॅकेज, नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीची आर्थिक मदत , फळबागउत्पादकांसाठी स्वतंत्र मदत जाहीर करून रोजगार हमीची कामे सुरु करावीत.जिल्ह्यातल्या ६२ दिवस पुरेल एवढाच जनावरांचा चारा शिल्लक आहे.जिल्हाप्रशासनाने आवश्यकतेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात मात्र त्यात घोटाळाहोणार नाही,याची दक्षता घ्यावी,अशी मागणीही घुगे यांनी यावेळी केली.पीकविमा भरूनही शेतकर्यांना नुकसानभरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.मंजूर दाव्यांची रक्कम खात्यात जमा होण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारीआहेत. विमा कंपन्यांकडून दाव्यांबाबत पारदर्शकता नसल्याच्या तक्रारीहीआहेत. दुष्काळग्रस्त शेतकर्यांचा पीकविमा हप्ता शासनाने माफ करावा किंवास्वतः भरावा. मंजूर पीकविमा दाव्यांची रक्कम तातडीने जमा करावी. प्रलंबितदाव्यांची तालुकानिहाय माहिती जाहीर करावी. नाकारलेल्या दाव्यांचीपुनर्तपासणी करावी. नुकसानग्रस्त शेतकर्यांना विशेष आर्थिक पॅकेजद्यावे, पात्र शेतकर्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करावे. दुष्काळग्रस्त
शेतकर्यांची सक्तीची कर्जवसुली थांबवावी.तसेच मायक्रो फायनान्सकंपनीच्या सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र महिलांना दरमहा १५०० रूपयेनियमित मिळावे, पात्र महिलांचे प्रलंबित हप्ते तातडीने जमा करावेत.ई-केवायसीमधील अडचणी दूर करण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत. पात्रमहिलांचे लाभ कोणत्याही तांत्रिक कारणामुळे बंद करू नयेत,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, शिष्यवृत्तीचे प्रश्न निकाली काढावेत, अशीमागणीही घुगे यांनी यावेळी केली. जालना जिल्हा प्रशासनाने दुष्काळनिवारणासाठी तातडीने उपाययोजना राबविल्या नाहीत, तर शिवसेना रस्यावरउतरून आंदोलन छेडेल,असा इशाराही घुगे यांनी यावेळी दिला.
००००००००००फोटो ओळी……१४- जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना शिवसेना महिला आघाडीच्याजिल्हाप्रमुख रुपम घुगे सोबत शिवसेना पदाधिकारी.
०००००००००००००



