vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दरडग्रस्त कुटुंबांना हक्काची घरे देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा**स्थानिकांच्या गरजांनुसार दर्जेदार घरांची उभारणी करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे**महाड व पोलादपूर तालुक्यातील बाधित गावांच्या पुनर्वसनाचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा*

*दरडग्रस्त कुटुंबांना हक्काची घरे देण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा**स्थानिकांच्या गरजांनुसार दर्जेदार घरांची उभारणी करा-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे**महाड व पोलादपूर तालुक्यातील बाधित गावांच्या पुनर्वसनाचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा*

रायगड-अलिबाग प्रतिनिधी) महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांमधील घरांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक असून अनेक वर्षांपासून घरांपासून वंचित असलेल्या बाधित कुटुंबांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही युद्धपातळीवर करावी. पारमाची येथील १९८ घरांची उभारणी तातडीने सुरू करून स्थानिकांच्या गरजांनुसार चांगल्या दर्जाची घरे बांधावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दरडग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन ही शासनाची जबाबदारी असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात महाड व पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त गावांतील घरांच्या प्रश्नांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, खासदार ज्योती वाघमारे, जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष सुनील कविस्कर, विकास गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, घर हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. दरड कोसळल्यामुळे अनेकांची घरे आणि कुटुंबातील माणसे गमावली आहेत. पारमाची येथील १९८ घरांच्या उभारणीसाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करावी. संबंधित यंत्रणांनी उपलब्ध यंत्रणा घटनास्थळीच ठेवून घरांचे बांधकाम सुरू करण्याचे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.घरे बांधताना केवळ फ्लॅट पद्धतीची घरे न बांधता स्थानिकांच्या जीवनशैलीला अनुरूप, चांगल्या दर्जाची आणि चांगल्या प्रतीची घरे उभारावीत. बांधकाम सुरू झाल्यानंतर आपण स्वतः पाहणीसाठी येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तळीये येथील उर्वरित घरांच्या प्रश्नाबाबतही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.  ते पुढे म्हणाले, दरडग्रस्त नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. रोटी, कपडा आणि मकान उपलब्ध करून देण्याच्या भूमिकेतून शासन काम करीत असून, गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून दिला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांच्या हिताची कामे करताना कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.पालकमंत्री भरत गोगावले म्हणाले, सन १९९६ पासून दरड कोसळणे, अतिवृष्टी व अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे या भागातील अनेक घरे बाधित झाली आहेत. या कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार पुरेशी घरे उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. बैठकीस संबंधित गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******

संबंधित पोस्ट

पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ या माहितीपटाचा आयनॉक्स चित्रपटगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘प्रीमियर शो’ 

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण

साईभक्तांसाठी मोठी पर्वणी! पुणे-साईनगर शिर्डी थेट रेल्वे सेवेचा थाटात शुभारंभ.

जालना विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात अवघ्या ५७ दिवसांत निकाल देत आरोपीला नैसर्गिक जीवनापर्यंत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर चुरणीगावात साधला महिलांशी संवाद; काटकुंभ आणि चुरणी आरोग्य केंद्राची पाहणी

vishwatmaklokswamivarta

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे