vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी #उपाययोजनांना प्राधान्य द्या– पालक सचिव प्रवीण दराडे#पाणी, #चारा नियोजनासह प्रलंबित नळ योजनांची कामे गतीने पूर्ण करा

#दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी #उपाययोजनांना प्राधान्य द्या– पालक सचिव प्रवीण दराडे#पाणी, #चारा नियोजनासह प्रलंबित नळ योजनांची कामे गतीने पूर्ण करा

राज्य प्रतिनिधी-#जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर प्रभावीपणे मात करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करून पाणीपुरवठ्याचे स्रोत बळकट करावेत. नागरिकांचे टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विहिरींसारख्या स्थानिक जलस्रोतांचे बळकटीकरण करण्याबरोबरच पाणीपुरवठ्याच्या कायमस्वरूपी उपाययोजनांना प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे वेगाने पूर्ण करावीत, तसेच आवश्यकतेनुसार नळ योजनांची विशेष दुरुस्ती करावी, असे निर्देश सहकार विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव प्रवीण दराडे यांनी दिले.

पालक सचिव श्री. दराडे यांनी #अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मनपा आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

#दुष्काळी परिस्थितीमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर अवलंबून न राहता दीर्घकालीन #नियोजन करणे आवश्यक असल्याचे श्री. दराडे यांनी सांगितले. गावपातळीवरील उपलब्ध जलस्रोतांची क्षमता वाढविणे, विहिरींचे बळकटीकरण करणे आणि पाणीपुरवठा योजनांमधील अडचणी दूर करणे यावर भर द्यावा. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत कसा जिरवावा यासाठी #धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्न चा अभ्यास करावा. प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

#चारा उपलब्धतेसाठी नियोजन करण्याचे आवाहन#दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची कमतरता भासू नये, यासाठी आगामी हंगामाचे नियोजन आतापासूनच करावे. भविष्यात मका आणि रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात चारा बियाणांचे वाटप करावे, अशा सूचना त्यांनी कृषी विभागाला दिल्या.

#पारंपरिक चारा उत्पादनासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चारा उपलब्धता वाढविणे आवश्यक आहे. यासाठी हायड्रोपोनिक चारा उत्पादन पद्धतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. या पद्धतीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके शेतकऱ्यांना दाखवून त्यांना या तंत्रज्ञानाची माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या चाऱ्याचे योग्य पद्धतीने सूक्ष्म नियोजन करून पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध राहील, याची दक्षता घ्यावी, असेही श्री. दराडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची #केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विभागांनी समन्वय साधाव

शेतकऱ्यांना विविध शासकीय #योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रलंबित केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महसूल विभाग, कृषी विभाग आणि निबंधक कार्यालय यांनी परस्पर समन्वयाने काम करावे. या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देशही पालक सचिव श्री. दराडे यांनी दिले.जिल्ह्यातील #दुष्काळ निवारण उपाययोजनांचे सादरीकरण

बैठकीच्या प्रारंभी निवासी उप जिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीपुरवठ्याचे नियोजन, चारा उपलब्धता तसेच दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी विविध विभागांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. #दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

संबंधित पोस्ट

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानला जामीन देताना नाशिक पोलिसांची तुलना ‘कंसा’शी करू नका ! – हिंदू जनजागृती समिती

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सहा गावांची कामे पूर्ण- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

जनगणना २०२७: नागरिकांसाठी १५ मे पर्यंत ‘स्व-गणना’ करण्याची संधी

सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातपाच हजार रूपये अग्रिम जमा होण्यास सुरवात- जिल्हाधिकारी ड़ॉ. मैनाक घोष

vishwatmaklokswamivarta

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करण्याकरितावेळापत्रकात दि.15 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

जलपुनर्भरणासंदर्भात व्यापक जनजागृती करावी – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे उद्‌घाटन