
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी
ठाणे प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा (SIR) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत सध्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू आहे.
या विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत ज्या मतदारांना गणनाप्रपत्र निर्गमित करुनही त्यांची नावे ASDD (Absence, Shifted, Dead, Duplicate) या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आल्यामुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकलेली नाहीत, अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत आपली नावे समाविष्ट करण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे.
त्यानुसार 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक 30.11.2026 पर्यत गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन व दिनांक 10.12.2026 पर्यत गणना प्रपत्रे निकाली काढण्यात येणार आहेत. तरी ASDD प्रवर्गात समाविष्ट झालेल्या मतदारांनी या संधीचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आवाहन 146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे.



