vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सोलापूरमधील ‘डॉक्युमेंट जिहाद’द्वारे १,५०० हून अधिक प्लॉट बळकावणाऱ्या रॅकेटवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करा!‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’तून एसआयटी (SIT) चौकशी व बनावट मिळकत नोंदी तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी*

*सोलापूरमधील ‘डॉक्युमेंट जिहाद’द्वारे १,५०० हून अधिक प्लॉट बळकावणाऱ्या रॅकेटवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करा!‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’तून एसआयटी (SIT) चौकशी व बनावट मिळकत नोंदी तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी*

*सोलापूर : प्रतिनिधी* सोलापूर शहरातील ५२ नगरांमध्ये बनावट आधारकार्ड, बनावट नोटरी, फोटोशॉप केलेले खरेदीदस्त आणि शासकीय यंत्रणेच्या कथित संगनमताने १,५०० हून अधिक प्लॉट हडप करणाऱ्या संघटित ‘डॉक्युमेंट जिहाद’ व ‘लँड जिहाद’च्या रॅकेटविरोधात आज, बुधवार दि. २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे समितीच्या वतीने तीव्र *‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’* करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, श्री. दत्तात्रय पिसे, श्री. बालाजी कामूर्ती, श्री. विनोद रसाळ, श्री. धंनजय बोकडे, श्री. शिवराज गडदे, सौ. राजश्री देशमुख, कु. वर्षा जेवळे, प्रज्ञापुरी ज्ञानपीठाचे पिठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय विशेष तपास पथकाद्वारे (SIT) चौकशी करून दोषी भूमाफिया व भ्रष्ट शासकीय अधिकाऱ्यांवर ‘मोक्का’ अंतर्गत कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आंदोलनानंतर प्रशासनाला सादर करण्यात आले.

वृत्तपत्रात पुराव्यानिशी प्रसिद्ध केलेल्या वृत्तमालिकेतून या महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. सन २०१८ पासून शहरातील ५२ नगरांतील १,५०० हून अधिक प्लॉट मूळ मालकांना अंधारात ठेवून बळकावले गेले असून, एकाच संशयित आरोपीकडे स्वतःच्या छायाचित्रासह २१ आधारकार्डे सापडली आणि त्याद्वारे एका वर्षात ७० जागा हडपल्या गेल्या. मृत व्यक्ती व अस्तित्वात नसलेल्या वकिलांचे बनावट शिक्के मारून ४३ प्लॉटच्या महापालिका नोंदी, फोटोशॉपद्वारे ३३ वर्षांपूर्वीचा दस्त बदलून १६ प्लॉटची विक्री, गरीब व्यक्तींना पैसे देऊन बनावट मालक उभे करणे, दुय्यम निबंधक कार्यालय क्र. २ मधील ऑफलाइन दस्तनोंदणीचा गैरवापर आणि अवघ्या एका दिवसात वीजजोडणी असे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. विशेष म्हणजे, २००८ मधील कट्टरवादी संघटनांच्या बैठकीचा संदर्भ आणि ठरावीक भागांतील लोकसंख्येच्या रचनेत (डेमोग्राफी) छुप्या पद्धतीने बदल घडविण्याचे हे षड्यंत्र असल्याचा पोलिसांचा संशय शहराच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर असल्याचे आंदोलकांनी नमूद केले.

एमआयडीसी, विजापूर नाका व सदर बझार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल होऊनही हे रॅकेट अद्याप सक्रिय आहे. पोलिसांनी बनावट ठरवून लेखी पत्र दिले असतानाही सोलापूर महापालिकेच्या कर विभागाने ४३ बनावट मिळकत नोंदी अद्याप रद्द केल्या नसून, उलट मूळ मालकांनाच ‘न्यायालयात जा’ अशी पत्रे देऊन त्यांची पिळवणूक चालवली आहे. त्यामुळे या सर्व ४३ बनावट नोंदी तात्काळ रद्द कराव्यात, महापालिकेने २५-३० वर्षांत केलेल्या २९,००० नोंदींपैकी संशयित ४,००० हून अधिक नोंदींचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करावे आणि या गैरव्यवहारात सहभागी महापालिका, महसूल (तलाठी), दुय्यम निबंधक कार्यालय क्र. २ व महावितरणमधील दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन करून त्यांना सहआरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करावे, अशी जोरदार मागणी या वेळी करण्यात आली.

यासोबतच एकाच छायाचित्रावरील २१ आधारकार्डे, बनावट राजपत्रे व मृत व्यक्तींच्या नावे झालेल्या मुद्रांक विक्रीची UIDAI व मुद्रांक विभागामार्फत स्वतंत्र चौकशी करावी, बेकायदेशीर वीजजोडण्या खंडित कराव्यात आणि दहशतीखालील मूळ प्लॉट मालकांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष व पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. शासनाने व प्रशासनाने या ‘डॉक्युमेंट जिहाद’ची तातडीने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई न केल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, *असा इशारा या वेळी श्री. दत्तात्रय पिसे यांनी दिला.*. सुनील घनवट,राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड,हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ७०२०३८३२६४)

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औषध निरीक्षक गट-बचाळणी परीक्षा २२ मार्च रोजी; ११६४० उमेदवारांची बैठक व्यवस्था..

रक्तदान शिबीर हा महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम – पालकमंत्री संजय शिरसाट

vishwatmaklokswamivarta

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानसर्व मतदारांनी आपला मतदानाचा अमूल्य हक्क बजावावा- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- मतदान पथके साहित्य घेऊन रवाना, पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 159 मतदान केंद्रे असून 88 हजार 70 मतदार- शिक्षक मतदारसंघासाठी 48 मतदान केंद्रे असून 8 हजार 62 मतदार

vishwatmaklokswamivarta

आगामी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांसाठी विशेष विधेयक मांडणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार· केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्यस्तरीय ‘जेंडर रिसोर्स सेंटर’ स्थापन करणार

महाराष्ट्रातही विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या पदवीधर, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदार संघात २३ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरुवात झाली

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित..महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडी पर्यटन प्रकल्प…