vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्ज्वलित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह देशभरात १५० हूनअधिक ठिकाणी ‘सामूहिक शस्त्रपूजन’ !

हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्ज्वलित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसह देशभरात १५० हूनअधिक ठिकाणी ‘सामूहिक शस्त्रपूजन’ !

राज्य प्रतिनिधी  –    मुंबई – विजयादशमीचा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय. हे पर्व अधर्मावर धर्माची, असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतिक मानले जाते. विजयादशमीच्या दिवशी श्री दुर्गादेवीने महिषासुरावर विजय मिळवला, तर प्रभु श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध करून अधर्म संपवला. याच दिवशी पांडवांनी अज्ञातवास संपवून पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतले होते. तोच उद्देश ठेवून हिंदूंच्या मनातील शौर्याची भावना पुन्हा प्रज्ज्वलित होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात १५० हून अधिक ठिकाणी ‘सामूहिक शस्त्रपूजन’ आयोजित करण्यात आले होते.

   मुंबईत पवई येथे तर नवी मुंबई येथील नेरुळ, तुर्भे, ठाणे (प.) तसेच रायगड जिल्ह्यात पनवेल, अलिबाग आणि पाली आदी ठिकाणी हे शस्त्रपूजन करण्यात आले. यात प्रारंभी उद्देश आणि महत्त्व सांगितल्यानंतर शस्त्रपूजन विधी करण्यात आला. श्री दुर्गादेवीची आरती करण्यात आली. ‘श्री दुर्गादैव्ये नम:’ हा सामूहिक नामजप केल्यानंतर हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घेण्यात आली. ‘ या शस्त्रपूजनाच्या माध्यमातून आम्हा सर्वांमधील शौर्य जागृत होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समर्पित होता येऊ दे’, अशी श्री दुर्गादेवीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. सर्व ठिकाणी घेण्यात आलेल्या पूजनाला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.डॉ. उदय धुरी,प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

0000

संबंधित पोस्ट

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर

vishwatmaklokswamivarta

जपानमधील ‘पंच’ नावाचा चिमुकला जपानी मकाक सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला..

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता मोहिम;श्रमदानातून झाला परिसर स्वच्छ

महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे सन २०२९ पर्यंत समूळ उच्चाटन नशामुक्त भारत अभियानात पुढचे पाऊल, सर्वसमावेशक धोरण.. आणि मंत्रिमंडळ निर्णय

vishwatmaklokswamivarta

महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न

दिलेला शब्द पाळला… 👏🏻शिवकन्याताईंनी शिक्षणासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल! 📚🎉