vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

आज परशुराम आर्थिक विकास महामंडळातर्फे नियोजन भवनात विभागस्तरीय शिबिर ;बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी

आज परशुराम आर्थिक विकास महामंडळातर्फे नियोजन भवनात विभागस्तरीय शिबिर ;बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी

अमरावती, प्रतिनिधी): ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘परशुराम आर्थिक विकास महामंडळा’मार्फत गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अमरावती येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात हे एकदिवसीय

विशेष विभागस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात योजनांची सविस्तर माहिती देण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारले जाणार आहेत.        महामंडळामार्फत प्रामुख्याने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि

गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येतात. इच्छुक लाभार्थ्यांनी महामंडळाच्या pavm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पूर्व-नोंदणी करून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केले आहे.      अधिक माहितीसाठी पुणे येथील विधान भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा ०२०-२९९८२१२५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

००००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण

खरीप हंगाम २०२५-२६ अंतर्गत धान्य खरेदीस प्रारंभ शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

माझी वसुंधरा अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा गौरव !पर्यावरणमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार 

सह्याद्रीच्या कुशीत रंगलेला ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२६’

पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

जिल्ह्यातील शोध व बचाव पथकांचे काटेपूर्णा प्रकल्प येथे प्रशिक्षण राज्य पथकाच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन..