
जिल्ह्यात 75 टँकरव्दारे 67 गावे, 486 वाड्यातीलएक लाख 45 हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा
सांगली प्रतिनिधी, : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 24 नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार 67 खाजगी व 8 शासकीय अशा एकूण 75 टँकरव्दारे 67 गावे व 486 वाड्यातील 1 लाख 45 हजार 234 बाधित लोकसंख्येला व 99 हजार 816 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 30 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत.
जत तालुक्यातील टंचाईग्रस्त 57 गावे व 414 वाड्यांमधील सुमारे 1 लाख 24 हजार, 867 लोकसंख्येला आणि 81 हजार 222 पशुधनाला 64 टँकरद्वारे (57 खाजगी व 7 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 18 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून 4 डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 2 गावे व 15 वाड्यांमधील 3180 लोकसंख्येला आणि 2382 पशुधनाला 2 टँकरव्दारे (1 खाजगी व 1 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 2 खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 6 वाड्यांमधील 855 लोकसंख्येला 1 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 7 गावे व 51 वाड्यांमधील 16332 नागरिकांना आणि 16212 पशुधनाला 8 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 4 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत. खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहे
0000
•



