vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

आज २४ नोव्हेंबर आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०२५ यावर्षी चित्रपट जगतातील ही मॅन म्हणून ओळखला जाणारा एक अभिनेता #धर्मेंद्र हे जग सोडून गेला आज त्याची पहिली पुण्यतिथी

आज २४ नोव्हेंबर आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०२५ यावर्षी चित्रपट जगतातील ही मॅन म्हणून ओळखला जाणारा एक अभिनेता #धर्मेंद्र हे जग सोडून गेला आज त्याची पहिली पुण्यतिथी

बॉलीवूड प्रतिनिधी-आज २४ नोव्हेंबर आहे. गेल्यावर्षी म्हणजे २०२५ यावर्षी चित्रपट जगतातील ही मॅन म्हणून ओळखला जाणारा एक अभिनेता #धर्मेंद्र हे जग सोडून गेला आज त्याची पहिली पुण्यतिथी आहे . धर्मेंद्र हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय अभिनेते होते. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्रा यांनी २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या.

धर्मेंद्रने उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. इ.स. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकींत ते राजस्थानच्या बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य झाले.त्यांनी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई येथे त्यांच्या निवास्थानी अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडचा “ही-मॅन” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र नेहमीच सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरले. एकेकाळी दिलीप कुमार यांना त्यांचे प्रेरणास्थान मानणारे धर्मेंद्र लवकरच लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनले आणि आज जगभरातील लोक त्यांचे कौतुक करतात. त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. पंजाबमधील एका लहानशा गावात असलेल्या सहेनवालमध्ये जन्मलेल्या धर्मेंद्र यांनी चित्रपटसृष्टीत कोणत्याही गॉडफादरशिवाय एक स्थान निर्माण केले आणि लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनले. धर्मेंद्र यांच्या कठोर परिश्रम, समर्पण आणि प्रतिभेचे हे फळ आहे ज्यामुळे त्यांना डझनभर हिट चित्रपट मिळाले आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. धर्मेंद्र यांचे खरे नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल आहे, परंतु चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर ते धर्मेंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सहनेवाल गावातील एका जाट शीख कुटुंबात झाला. धर्मेंद्र यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण लालटन कलान येथे केले, जिथे त्यांचे वडील केवल कृष्ण हे मुख्याध्यापक होते. त्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या इंटरमिजिएट शिक्षणासाठी फगवाडा येथील रामगढिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी ११ वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांना पुढे शिक्षण घ्यायचे होते, परंतु अभिनयाची त्यांची आवड त्यांना मागे टाकत गेली आणि ते पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत.धर्मेंद्र यांचे दोनदा लग्न झाले आहे. १९ वर्षांचे असताना त्यांचे लग्न प्रकाश कौरबरोबर झाले होते. हे १९५४ मध्ये घडले. तेव्हा त्यांनी चित्रपटांमध्येही प्रवेश केला नव्हता. या लग्नापासून त्यांना सनी देओल आणि बॉबी देओल हे दोन मुलगे आणि अजिता आणि विजेता या दोन मुली झाल्या. त्यानंतर त्यांनी १९८० मध्ये हेमा मालिनीशी लग्न केले. चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर, धर्मेंद्र एकत्र काम करत असताना तिच्या प्रेमात पडले. असे म्हटले जाते की धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला जेणेकरून त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट घ्यावा लागू नये. तथापि, धर्मेंद्र यांनी हे नाकारले आहे. धर्मेंद्र यांच्या मागे दोन बायका, ६ मुलं आणि नातवंडं असा परिवार आहे. पहिल्या लग्नानंतर, धर्मेंद्र चित्रपटात करिअर करण्यासाठी मुंबईत गेले. फिल्मफेअर मासिकाचा न्यू टॅलेंट अवॉर्ड जिंकल्यानंतर ते मुंबईत आले. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये “#दिल #भी #तेरा #हम #भी #तेरे” या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि मागे वळून पाहिले नाही. त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप झाला, परंतु त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर, १९६१ मध्ये धर्मेंद्र यांनी “#शोले #और #शबनम,” “#अनपढ” आणि “#बंदिनी” यासह अनेक हिट चित्रपट दिले. धर्मेंद्रचा करिष्मा मनमोहक होता आणि प्रत्येक चित्रपट निर्माता आणि नायिका त्यांच्यासोबत काम करू इच्छित होती. त्यांनी “#शोले”, “#सीता #और #गीता”, “#धर्म #वीर”, “#यादों #की #बारात”, “#चरस” आणि “#चुपके #चुपके” असे अनेक हिट चित्रपट दिले आणि वयाच्या ८९ व्या वर्षीही ते काम करत होते अलिकडेच धर्मेंद्र यांच्या नवीन चित्रपट “इक्कीस” चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.रुपेरी पडद्यावर ॲक्शन हिरो किंवा ‘ही-मॅन’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते धर्मेंद्र कवी मनाचे व्यक्ती होते.मात्र, ॲक्शन हिरो किंवा ही-मॅन सारख्या नावांनी ओळखले जाणाऱ्या धर्मेंद्र यांना जर या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर ते यापलीकडे बरंच काही होते.अनुपमा या चित्रपटात एक संवेदनशील लेखक, सामाजिक बांधिलकी जपणारा सत्यकाममधील आदर्शवादी जिद्दी तरुण, विनोदानं पोट धरून हसवणारा चुपके-चुपके चित्रपटातील प्रोफेसर परिमल..

धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे असे अनेक पैलू होते.वास्तविक आयुष्यात ते कवी, एक प्रेमी, एक पिताअशी भूमिका करत होते.अभिनेते धर्मेंद्र यांचे भारतात तर लाखो चाहते आहेतच. मात्र पाकिस्तानातदेखील त्यांचे असंख्य चाहते आहेत. यात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचादेखील समावेश आहे.धर्मेंद्र त्यांच्या अभिनयासाठी प्रसिद्ध होतेच, तसंच त्यांच्या उदारपणाबद्दलचे किस्सेदेखील प्रसिद्ध होते.लेखक राजीव विजयकर यांनी ‘धर्मेंद्र – नॉट जस्ट अ ही-मॅन’ हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात धर्मेंद्र यांचे असे अनेक किस्से देण्यात आले आहेत.या पुस्तकात महेश भट्ट म्हणतात, “दो चोर या चित्रपटाच्या सेटवर मी सहाय्यक म्हणून काम करत होतो. मी नीट सूचना दिल्या नाहीत, त्यामुळे धर्मेंद्र यांचा ट्रक ड्रायव्हरचा पोशाख चित्रीकरण स्थळापासून दूर असलेल्या हॉटेलातच राहिला होता.””ते दृश्य कोणत्याही परिस्थितीत सकाळी-सकाळीच चित्रीत होणं आवश्यक होतं. नाहीतर निर्मात्याचं मोठं नुकसान झालं असतं. मग मी धर्मेंद्र यांना माझी अडचण सांगितली.”पुढे म्हणतात, “धर्मेंद्र यांनी सहानुभुतीनं माझं म्हणणं ऐकून घेतलं. ते उठले, जवळच एक ट्रक ड्रायव्हर होता. ते त्या ड्रायव्हरकडे गेले. धरमजींनी त्या ड्रायव्हरनं घातलेले मळलेले कपडे तात्पुरते त्याच्याकडून घेतले आणि एक ड्रेसमॅननं केलेली चूक त्यांच्या उदारपणानं आणि कल्पनाशीलतेनं झाकून टाकली.”लहानपणी, एकदा धर्मेंद्र यांनी चोरून दिलीप कुमार यांचा शहीद हा चित्रपट पाहिला. तो 1948 सालचा चित्रपट होता.धर्मेंद्र म्हणतात की त्या चित्रपटानं आणि दिलीप कुमार यांनी त्यांच्या मनावर जणू काही गारुडच केलं होतं. एकप्रकारे त्याच दिवशी त्यांचं भवितव्य निश्चित झालं होतं.बिमल रॉय यांनी धर्मेंद्र यांना अभिनयाची पहिली संधी दिली होती. तो चित्रपट होता ‘#बंदिनी’. बिमल रॉय त्यांना ‘धर्मेंदू’ म्हणायचे.अर्थात बंदिनी चित्रपट पूर्ण होण्यास वेळ लागला. या दरम्यान संघर्षाच्या काळात अर्जुन हिंगोरानी यांनी धर्मेंद्र यांना #दिल #भी #तेरा #हम #भीतेरे’ या चित्रपटात भूमिका दिली

1966 मध्ये आलेल्या ‘फूल और पत्थर’ या चित्रपटानं खऱ्या अर्थानं सोलो हिरो म्हणून धर्मेंद्र यांची ओळख निर्माण झाली. या चित्रपटात एक दृश्य होतं की गुंड, दारुड्याच्या भूमिकेतील धर्मेंद्र त्यांचा शर्ट काढून एक भिकारी आणि विधवेच्या अंगावर टाकतात.त्यावेळेस कोणत्याही हिरोची अशी बॉडी नव्हती. याच चित्रपटात ही-मॅनची पहिली झलक पाहायला मिळाली. याच चित्रपटानं धर्मेंद्र यांना फिल्मफेअरचं पहिलं नामांकनदेखील मिळवून दिलं.1960 चं दशक येईपर्यंत धर्मेंद्र यशाच्या पायऱ्या चढत होते, मात्र त्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावं लागत होतं.60 च्या दशकाच्या सुरूवातीला जेव्हा धर्मेंद्र यांच्या करियरची सुरूवात होत होती, तेव्हा शम्मी कपूरचा जमाना होता. 1970 चं दशक सुरू होईपर्यंत राजेश खन्ना नावाचं वादळ आलं. तर धर्मेंद्र जेव्हा यशाच्या शिखरावर होते, तेव्हा अमिताभ बच्चन यांनी सर्वांवर गारुड केलेलं होतं.मात्र या सर्व स्पर्धेतदेखील धर्मेंद्र बहुधा एकमेव अभिनेते होते जे 60 च्या दशकापासून ते 80 च्या दशकापर्यंत हिट मशीनप्रमाणे टिकून राहिले.धर्मेंद्र यांच्या करियरबद्दल बोलायचं, तर ‘अनुपमा’ आणि ‘सत्यकाम’ हे माझे आवडते चित्रपट आहेत. ते ऋषिकेश मुखर्जींनी बनवले होते.

1969 मध्ये आलेल्या सत्यकाममध्ये धर्मेंद्र यांची भूमिका वेगळीच होती. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात, सत्याला सर्वात वरचं स्थान देणारा सत्यप्रिय (धर्मेंद्र) त्याचं सर्वकाही पणाला लावण्याइतका आदर्शवादी असतो.एखादं पात्र आपल्या मनात एकाच वेळी इतक्या भावना कशा काय निर्माण करू शकतो, याचा विचार करूनही आपण थक्क होतो. इतकं दु:ख, वेदना, प्रेम, भीती, सहानुभूती आणि अभिमान. ऋषिकेश मुखर्जीदेखील सत्यकामला त्यांचा आणि धर्मेंद्र यांचा सर्वोत्तम चित्रपट मानत असत.तर अनुपमा या चित्रपटात धर्मेंद्र असे मनात घर करणारे लेखक होते, जो अशा मुलीच्या मनात स्थान मिळवतो, जिनं सर्वांसाठी मनाचे दरवाजे बंद केले आहेत.तो लेखक जेव्हा गातो की ‘या दिल की सुनो दुनियावालों या मुझको अभी चुप रहने दो… किंवा तो गातो, छलकाए जाम आइए आपकी आँखों के नाम, हे गीत गातो, तेव्हा तो तुमच्या मनाला खोलवर स्पर्श करून जातो.नंतर धर्मेंद्र यांचे ‘हकीकत’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘ममता’, ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ यासारख्या चित्रपट आले. या चित्रपटांमध्ये बिमल रॉय, ऋषिकेश मुखर्जी, चेतन आनंद यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी त्यांच्या अभिनयाला आणखी पैलू पाडले.मग आलं 1970 चं दशक, ज्यात धर्मेंद्र यांचं वेगळंच रूप प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर दिसलं. त्यात ॲक्शन, रोमान्स, कॉमेडी, असं व्यावसायिक सिनेमात असणारं सर्वकाही होतं. या काळात धर्मेंद्र यांचे ‘जीवन मृत्यू’, ‘सीता और गीता’, ‘चरस’, ‘ब्लॅकमेल’, ‘चुपके चुपके’ हे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट आले.1975 साली शोले प्रदर्शित झाला. या चित्रपटातील वीरूच्या भूमिकेनं तर धर्मेंद्र यांची वेगळीच ओळख निर्माण झाली. तोपर्यंत त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती.

“शोले” मधील पाण्याच्या टाकीवर चढण्याचा तो सदाबहार सीन कोण विसरू शकेल.’व्हेन आय डेड, पोलीस कमिंग..पोलीस कमिंग, बुढिया गोईंग जेल…इन जेल बुढिया चक्की पीसिंग अँड पीसिंग अँड पीसिंग’ हे संवाद आजदेखील प्रेक्षकांना पाठ आहेत.टांगेवाल्या बसंतीबरोबर टांग्यावर रोमान्स करणारा वीरू लोकांना भावला होता. त्यामुळे या चित्रपटानं धर्मेंद्र यांचं स्टारडम प्रचंड वाढलं होतं.धर्मेंद्र ऐन भरात असताना त्यांचा समावेश जगातील सर्वात देखण्या पुरुषांच्या यादीत करण्यात आला होता.अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ पाडणारा हा कलाकार नृत्यकौशल्यात मात्र जेमतेमच होता. मात्र तरीदेखील जट पगला यमला दिवाना सारखी त्यांची गाणी अत्यंत लोकप्रिय झाली.मुलांना जरी चित्रपटांच्या दुनियेत आणलं तरी मुलींना या क्षेत्रात आणण्यासाठी धर्मेंद्र तयार नव्हते. ईशा आणि अहाना या मुलींनी चित्रपटात काम करावं असं त्यांना वाटत नव्हतं.करियर यशाच्या शिखरावर असताना धर्मेंद्र यांना दारूचं व्यसन जडलं होतं. त्यामुळे त्यांचं बरंच नुकसानदेखील झालं. ते स्वत:देखील हे मान्य करतात.सत्यकाम आणि चुपके-चुपके सारखे अप्रतिम चित्रपट करणाऱ्या धर्मेंद्र यांना 1990 च्या दशकात पापी देवता, वीरू दादा, डाकू भैरव सिंह, महा शक्तिशाली यासारख्या चित्रपटात भूमिका कराव्या लागल्या. त्यांच्या या भूमिका पाहणं हे त्यांच्या अनेक चाहत्यांसाठी वेदनादायी होतं.धर्मेंद्र यांनी केवळ चित्रपटांमध्ये काम केले नाही तर त्यांनी . भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना २०१२ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आणि फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आपण त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहू या 🙏🙏🙏

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एनएमआयसी-एनएफडीसीने अभिनेत्री खुशबू सुंदर यांच्या प्रेरणादायी मुलाखतीचे केले आयोजन

दिग्दर्शक प्रकाश मेहरांच्या स्मृतिदिन उत्साहात साजरा 

कानडा राजा पंढरीचा’मधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची स्वरांजली विलेपार्ले येथे ‘सोळावं वरीस धोक्याचं’ कार्यक्रम

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

vishwatmaklokswamivarta

🎥 महालक्ष्मी सरस नवी मुंबई २०२६: रील चॅलेंज आता सुरू! 🏆मुंबई आणि नवी मुंबईतील कंटेंट क्रिएटर्स—तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी