vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

ज्ञानभारतम् प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला सुरूवात

बुलढाणा, प्रतिनिधी: भारताला हस्तलिखितांचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. पारंपारिक ज्ञान हे पिढीदर पिढी या हस्तलिखितांद्वारे प्रसारीत होत आलेले आहे. परंतू हे सर्व हस्तलिखिते जागोजागी विखुरलेल्या स्वरुपात आहेत. या हस्तलिखिताचे ज्ञानभंडार एकत्र करुन एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देता यावे, या दृष्टीने केंद्र शासनाने ज्ञानभारतम् या प्रकल्पाची आखणी केली आहे.

या प्रकल्पाचा मुख्य उद्देश भारतातील मौल्यवान हस्तलिखित वारशाचे सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण, संवर्धन, डिजिटायझेशन व प्रसार करणे हा आहे. भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ज्ञानभारतम् या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला १६ मार्च २०२६ पासून प्रारंभ करण्यात आला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, धार्मिक संस्था तसेच खाजगी संग्राहक यांच्या सहकार्याने एक कोटीहून अधिक हस्तलिखितांचा शोध व नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेशी संबंधित हस्तलिखितांचा राष्ट्रीय डिजिटल संग्रह निर्माण करून तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. यामध्ये हस्तलिखितांची मालकी ही संबंधीत संस्था, ग्रंथालय अथवा खाजगी संग्राहक यांचीच राहणार आहे. परंतू कोणाला स्वखुशीने ही हस्तलिखिते राज्य शासनाकडे सुपूर्द करावयाची झाल्यास शासन ती स्वीकारेल.या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था, विद्यापीठे, संशोधन संस्था, हस्तलिखित संग्रहालये तसेच विद्वान यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी खालील संस्था क्लस्टर केंद्र व स्वतंत्र केंद्र म्हणून कार्यरत राहणार आहेत:• कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर – क्लस्टर केंद्र• भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, पुणे – क्लस्टर केंद्र• आनंद आश्रम संस्थान, पुणे – स्वतंत्र केंद्र• भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे – स्वतंत्र केंद्रमहाराष्ट्रासाठी राज्य नोडल संस्था म्हणून पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्य नोडल अधिकारी म्हणून सुजितकुमार उगले, संचालक, पुराभिलेख संचालनालय कार्य पाहणार आहेत. तर अंजली ढमाळ, उपसंचालक, मराठी भाषा

संबंधित पोस्ट

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे *पालखी सोहळा सुखकर आणि सुरक्षित पार पडण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे–विभागीय आयुक्त शितल तेली-उगले*

थोर समाजसुधारक, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावी खानवडी, पुणे येथे त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विद्यार्थ्यांसाठी शिक्षणस्नेही वातावरण निर्मितीवर भर – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

उमरखेड मतदारसंघातील हायब्रिड ॲन्युईटी टप्पा-२ मधील रस्ते कामांचा मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

इतर मागासवर्गीयांसाठी विविध कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अनिवार्य; योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहन