vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘प्रतिमा नवी मुंबईची’ छायाचित्रण स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन नवी मुंबईकर छायाचित्रकारांना सहभागी होण्याचे आवाहन

नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ‘प्रतिमा नवी मुंबईची’ छायाचित्रण स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन नवी मुंबईकर छायाचित्रकारांना सहभागी होण्याचे आवाहन

     नवी मुंबई प्रतिनिधी-     नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहराचे सौंदर्य, निसर्गसंपदा, सांस्कृतिक वैभव, ऐतिहासिक वारसा आणि विकासाचे विविध पैलू छायाचित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे जगासमोर आणण्याच्या उद्देशाने ‘प्रतिमा नवी मुंबईची – छायाचित्रण स्पर्धा २०२६-२७’ आयोजित करण्यात आली आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील (दिघा ते बेलापूर ) व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि शहराची वैशिष्ट्यपूर्ण ओळख छायाचित्रांच्या माध्यमातून अधोरेखित करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.

          या स्पर्धेचे आयोजन दोन स्वतंत्र गटांमध्ये करण्यात आले असून, त्यामध्ये व्यावसायिक गट आणि हौशी गट अशा दोन्ही गटांतील छायाचित्रकारांना सहभागी होता येणार आहे. व्यावसायिक गटातील विजेत्यांसाठी रु. २०,०००/- चे पारितोषिक, तर हौशी गटातील विजेत्यांसाठी रु. १२,०००/- चे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. दोन्ही गटांतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

          या स्पर्धेतील निवडक १२ उत्कृष्ट छायाचित्रकारांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या दिनदर्शिकेत विशेष स्थान देण्यात येणार आहे. संबंधित छायाचित्रे दिनदर्शिकेच्या प्रत्येक महिन्याच्या पानावर प्रसिद्ध केली जाणार आहेत. त्यामुळे छायाचित्रकारांना आपल्या कलाकृतीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

          स्पर्धेचा विषय ‘नवी मुंबईची वैशिष्ट्ये’ असा असून, नवी मुंबईतील म्हणजेच दिघा ते बेलापूर या महानगरपालिका क्षेत्रातील निसर्गरम्य परिसर, समुद्रकिनारे, खाड्या, उद्याने, ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, स्थापत्यकला, नागरी जीवन, सामाजिक-सांस्कृतिक उपक्रम तसेच शहराच्या आधुनिक विकासाचे विविध पैलू छायाचित्रांमधून सादर करता येणार आहेत.

          ‘तुमच्या नजरेतून नवी मुंबई… तुमच्या छायाचित्रातून नवी मुंबईची ओळख!’ या संकल्पनेनुसार आयोजित करण्यात येत असलेल्या या छायाचित्रण स्पर्धेला नवी मुंबईकर नागरिक आणि छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास नवी मुंबईच्या महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांनी व्यक्त केला आहे.

          तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील व्यावसायिक आणि हौशी छायाचित्रकारांनी लवकरच अर्ज नोंदणी सुरू होत असलेल्या या छायाचित्रण स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे दर्शन घडवावे, असे आवाहन क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती श्री.गिरीश कान्हा म्हात्रे व उपसभापती श्री.राजू मढवी यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

घरगुती पाणी बिलाच्या थकबाकीवरील प्रशासकीय आकारात (व्याज/दंड) १०० टक्के सूट नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे ५, १३, २३ वर्ष मुदतीचे रोखे विक्रीस

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात अत्याधुनिक आग नियंत्रण उपकरणाचे यशस्वी प्रात्यक्षिक! 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे पाच वर्षे मुदतीचे ८०० कोटी, १३ वर्षे मुदतीचे १६०० कोटी आणि २३ वर्षे मुदतीचे १२०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी जिल्ह्यात 22 हजार 375 महिलांची प्रक्रिया प्रलंबित